ETV Bharat / city

Heavy Rains Thane : ठाण्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी; रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली

author img

By

Published : Sep 16, 2022, 4:02 PM IST

Updated : Sep 16, 2022, 5:08 PM IST

मुंबईतही अनेक भागात पाणी साचले आहे. अशात ठाण्यातही अनेक सखल heavy rains many parts railway tracks are waterlogged भागात पाणी साचले आहे. संततधार सुरुच असल्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील काही रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेले आहेत.

Heavy Rains Thane
Heavy Rains Thane

ठाणे - राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईतही अनेक भागात पाणी साचले आहे. अशात ठाण्यातही अनेक सखल heavy rains many parts railway tracks are waterlogged भागात पाणी साचले आहे. संततधार सुरुच असल्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील काही रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेले आहेत. परतीच्या मुसळधार पावसामुळे जिल्हातील सखल भाग जलमय, तर रेल्वेसह मार्गावरील वाहतूक मंदावली.

ठाण्यात उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू केली असून या पावसाने ठाण्यात विक्रमी नोंद केली आहे. सकाळपासून पडणाऱ्या या पावसामुळे ठाण्यात अवघ्या ७ तासात विक्रमी ९३ मिमी इतकी नोंद झाली असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी विक्रमी नोंद आहे. या भयानक पडलेल्या पावसामध्ये सर्वात आधी मध्य रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आणि याचा परिणाम थेट प्रवासी वर्गावर पडला. मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिरा धावत आहे. ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणे जलमय झाले असून महापालिका प्रशासन पूर्ण पने फेल ठरले आहे. ठाण्यातील खड्ड्यांमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागला. पावसाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्डे बुजविने आणि पाणी न साचू देणे या साठी प्रशासनाला निर्देश देऊन देखील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आणि म्हणूनच अनेक ठिकाणी पाणी सचण्याचे प्रकार घडले आहेत.

मुसळधार पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी

विजांच्या कडकटासह जोरदास पाऊस गेल्या दोन दिवसापासून परतीच्या मुसळधार पावसामूळे जिल्ह्यातील सर्वच शहरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम रेल्वेसह मार्गववरील वाहतुकीवर होऊन हजारो वाहने अडकून पडली आहे. तर जिल्ह्यात सर्वत्र पावसा कहर पाहता भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, अंबरनाथ, टिटवाळा, उल्हासनगर, बदलापूर शहरातील बहुतांश सखल भाग जलमय झाले आहेत. तसेच धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने भातसा व बारवी धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केल्या जात असल्याने जिल्ह्यातील नदयासह खाडीला पूर आला आहे. त्यामुळे नदी व खाडी किनाऱ्यानजीक राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला.

काल सायंकाळी सुरू झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने शुक्रवारी जिह्यातील सर्वच व्यवहार ठप्प झाले शिवाय अनेक शहरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले आहे. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले होते. भिवंडी तालुक्यातील मेट्रो-५ चे काम सुरू असलेल्या हद्दीतील काल्हेर येथे रस्त्यावर पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागून मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या भागात फोफावलेला गोदाम पट्टा असल्याने ट्रान्सपोर्ट लाईनच्या गाड्यांची वर्दळीने नोकरदार वर्गासह चाकरमान्यांना सदर वाहतूककोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला. जिल्ह्यातील सर्वच महापालिकेकडून दावा केला जातो की, पावसाळ्य़ापूर्वी नाले सफाई केली जाते. पावसाळा सुरु झाला की, पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचण्याच्या घटना घडतात. काही दिवस पावसाने विश्रंती घेतली होती. मात्र दोन दिवसापासून सायंकाळपासून विजांच्या कडकटासह जोरदास पाऊस पडत आहे.

मोठी वाहतूक कोंडी कल्याण पश्चिमेतील मुख्य बाजार पेठेत पावसाचे पाणी साचले आहे. चिकनघर परिसरातील नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले होते. स्थानिक नागरीकांची तक्रार होती की, वारंवार तक्रार करुन देखील महापालिका लक्ष देत नाही. शिवाय कल्याण, डोंबिवली, मुब्रा, कळवा, ठाणे उल्हासनगर या रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने रेल्वे वाहतूकीवर परिणाम होऊन हजारो प्रवाशी अडकून पडले आहेत. दुपारनंतर पुन्हा एकदा जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ शहरात नेहमीच्या सखल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पहायला मिळाले. भिवंडी शहर व ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने शहरात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे.

ठिकठिकाणी साचलेल्या या पाण्यामुळे नागरिकांची मोठी दैना उडाली होती. त्याचबरोबर भिवंडी वाडा रस्त्यावर नदीनाका, अंजुरफाटा ते पूर्णा, अंजुरफाटा ते कल्याणनाका, अंजुरफाटा ते खारबाव रस्त्यावर पाणी साचल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. तर रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढतांना दुचाकी वाहने व रिक्षा बंद पडल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली.

Last Updated : Sep 16, 2022, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.