ETV Bharat / city

मीरा भाईंदर: मालमत्तेविषयी माहिती लपविणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

author img

By

Published : Nov 25, 2020, 2:59 PM IST

मीरा-भाईंदर महापालिकेत स्थायी स्वरूपात १ हजार ४५२ अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. यातील ५३२ कर्मचारी हे वर्ग ४ मधील पदावर आहेत. पालिका प्रशासनाकडून वर्षभर कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची माहिती तसेच संबंधित विभागाच्या मुख्य अधिकाऱ्याबद्दलचे वर्तणूक व माहिती सादर करण्यासाठी गोपनीय अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

मीरा भाईंदर महापालिका
मीरा भाईंदर महापालिका

मीरा भाईंदर(ठाणे) - मीरा भाईंदर महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना अहवाल व मालमत्ता दायित्व प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना दोन वेळेस देण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक कर्मचारी माहिती पुरवण्यास दिरंगाईपणा करत आहेत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी दिली.

मीरा-भाईंदर महापालिकेत स्थायी स्वरूपात १ हजार ४५२ अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. यातील ५३२ कर्मचारी हे वर्ग ४ मधील पदावर आहेत. पालिका प्रशासनाकडून वर्षभर कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची माहिती तसेच संबंधित विभागाच्या मुख्य अधिकाऱ्याबद्दलचे वर्तणूक व माहिती सादर करण्यासाठी गोपनीय अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

हेही वाचा-पालिका प्रशासनाला उशिरा शहाणपण; मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात

अधिकारी कर्मचारी करत आहेत दुर्लक्ष..!

सरकारी कर्मचाऱ्याच्या सद्यस्थितीत नावावर असलेली मालमत्ता, ठिकाण, मालमत्तेचा संपूर्ण तपशील, खरेदी केली त्यावेळेसची किंमत, मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न व बँक खात्यात जमा असलेल्या पैशांची माहिती देण्याची सूचना दिली होती. सर्वांची माहिती असणारे मालमत्ता दायित्व प्रमाणपत्र वर्ग १,२,३ मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सादर करण्याच्या सूचना १६ जून रोजी देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही काही अधिकाऱ्यांनी माहिती सादर न केल्यामुळे पुन्हा ३१ जुलै रोजी सूचना देण्यात आली. परंतु तरीदेखील वर्ग १ व २ मधील अनेक अधिकाऱ्यांनी महापालिकेला माहिती सादर केलेली नाही. त्यामुळे मनपा उपायुक्त अजित मुठे यांनी आस्थापना विभागाला लवकरच माहिती सादर न केल्यास कर्मचारी व अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच माहिती न देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन अदा करण्यात येणार नाही, असे परिपत्रक काढण्यात आले आहे.

हेही वाचा-भाईंदर खाडीवरचा पूल तोडण्यास सुरुवात, १३३ वर्षे जुना रेल्वेपूल होणार इतिहास जमा..

रुग्णांची संख्या कमी झाली असताना प्रशासनाचा ढिसाळ कारभार-

महानगरपालिका हद्दीत गेल्या अनेक दिवसात कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत घट झाली. त्यामुळे पालिकेतील आरोग्य विभाग सुस्त झाल्याचे दिसून आले आहे. आज प्रभाग समिती २ मध्ये मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसात मीरा भाईंदर शहरात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत घट झाली असली तरीही दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारू शकत नाही. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या नियमाचे पालन पालिका प्रशासन करताना दिसत नाही. रुग्ण संख्येत घट झाल्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांचा ढिसाळ कारभार सुरू झाला आहे. आतापर्यंत पालिका प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करताना कुठेही दिसली नाही. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाटेच्या भीतीपोटी पालिका प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपण अशी टीका होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.