ठाणे : राज ठाकरे अयोध्येला (Raj Thackeray Ayodya Tour) जात आहेत. ते नेमकं कशासाठी जात आहेत, हे माहित नाही. मात्र, राज ठाकरे हे भाजपचे बाहुले बनून काम करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ( Jayant Patil in Kohlapur) कोल्हापुरात केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर देत, राज ठाकरे तेव्हा तुमच्या बाजूने बोलायचे तर गुदगुल्या व्हायच्या आता राज ठाकरे सत्य बोलतात तर खाजवायला होतंय. असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीत (Devendra Fadnavis answered Jayant patil) लगावला.
राज ठाकरे यांचा घाव वर्मी लागतोय
भोंगाचे 'राज'कारण गाजत असतानाच राज ठाकरे यांनी आता अयोध्येला जाण्याची तयारी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचे गुऱ्हाळ उठले आहे. यातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरेंचे नाव पुढे करून भाजपावर निशाणा साधला. यालाच प्रत्युत्तर म्हणून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्यासोबत होते. 'तेव्हा त्यांचे बोल गुलुगुलु वाटत होते ,गुदगुल्या होत होत्या. आता राज ठाकरे सत्य बोलालयला लागले तर त्यांना खाजवायला होतंय. राज ठाकरे यांचा घाव वर्मी लागतोय .भारतीय जनता पार्टीला कोणालाही समोर करायची गरज नाही.' असे वक्तव्य विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते बुधवारी रात्रीच्या सुमारास भिवंडी हायवे दिवे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या कै. मनीबाई मोरेश्वर पाटील बालोद्यान लोकार्पण प्रसंगी आले होते. या प्रसंगी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील , आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित होते.
ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराची दररोज पोलखोल
भारतीय जनता पार्टी सक्षम असून आम्ही पोलखोल यात्रा सुरू केली आहे. दररोज पोलखोल करतोय. त्यामुळे सरकार आणि सरकार मधील पक्ष व्यथित झाले आहेत. त्यामुळे आमच्या पोलखोल यात्रेवर हल्ले केले जात आहेत. पण आम्ही घाबरणार नाहीत. त्यांनी किती ही हल्ले केले तरी आम्ही सरकारच्या भ्रष्टाचाराची दररोज पोलखोल करीत राहणार असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी केले.
हेही वाचा - नाशिक- अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना परवानगी देऊ नका, भाजपाची मागणी