ठाणे - शहरातील वर्तकनगरमधील नाल्यामध्ये फेकण्यात आलेल्या बॅगमध्ये नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. स्थानिक रहिवाशांनी वर्तकनगर पोलिसांना याची माहिती कळवल्यानंतर ठाणे महा नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने हे अर्भक ताब्यात घेऊन सिव्हिल रुग्णालयाच्या हवाली केले.
हेही वाचा... भांडुपमधील अपहरण झालेल्या चिमुकलीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला; हत्येपूर्वी नराधमाचा अत्याचार
ठाण्यातील वर्तकनगर येथील पोखरण रोड क्रमांक 1 येथील सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदिरनजीकच्या नाल्यात सोमवारी ठाणे महापालिकेचा सफाई कामगार नाल्यातील कचरा साफ करत असताना, त्याला नाल्यात सापडलेल्या एका बॅगमध्ये मृत अर्भक आढळून आले. त्यामुळे घाबरून ती बॅग तेथेच टाकून सफाई कामगाराने पळ काढला. त्यानंतर, स्थानिक नागरिकांनी याबाबत वर्तकनगर पोलिसांना कळवल्याने पोलिसांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती दिली. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी नाल्यातून ती बॅग वर काढून बॅगमधील अर्भक सिव्हिल रुग्णालयात पाठवले. तसेच अज्ञात व्यक्तीने अर्भक बॅगमध्ये भरून दोन ते तीन दिवसापूर्वीच नाल्यात फेकले असावे, असा वर्तवण्यात येत आहे. या घटनेची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात नोंद केली असून बॅगमालकाचा शोध सुरु आहे.
हेही वाचा... अरविंद सावंत यांनी दिला केंद्रीय अवजड मंत्रिपदाचा राजीनामा