ETV Bharat / city

भिवंडीत एक मजली धोकादायक इमारत कोसळली; जीवितहानी नाही - dangerous building

या संभवित घटनांमुळे सतर्क झालेल्या पालिका आयुक्त अशोक कुमार यांनी शहरातील प्रभागा अंतर्गत असलेल्या अनधिकृत व धोकादायक इमारती ची माहिती प्रभाग अधिकाऱ्याकडून तातडीने मागवली आहे. असे असतानाच महापालिका प्रशासकीय कार्यालयालगत इस्लामपूर येथील शकीना हाजी इंन्सनबी मियाजी यांच्या मालकीची ही धोकादायक आहे. ही  एक मजली इमारत दुपारी तीनच्या सुमारास अचानकपणे कोसळली.

भिवंडीत एक मजली धोकादायक इमारत कोसळली
author img

By

Published : Jul 18, 2019, 7:31 PM IST

ठाणे - भिवंडी महापालिका क्षेत्रातील इस्लामपुरा भागात आज दुपारच्या सुमारास एक मजली धोकादायक इमारत अचानकपणे कोसळली. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये एकच धावपळ उडाली होती. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भिवंडीत एक मजली धोकादायक इमारत कोसळली; पालिका क्षेत्रात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

या घटनांमुळे सतर्क झालेल्या पालिका आयुक्त अशोक कुमार यांनी शहरातील प्रभागाअंतर्गत असलेल्या अनधिकृत व धोकादायक इमारतींची माहिती प्रभाग अधिकाऱ्याकडून तातडीने मागवली आहे. असे असतानाच महापालिका प्रशासकीय कार्यालयालगत इस्लामपुरा येथील शकीना हाजी इंन्सनबी मियाजी यांच्या मालकीची ही धोकादायक इमारत आहे. ही एक मजली इमारत दुपारी तीनच्या सुमारास अचानकपणे कोसळली. या इमारतीमध्ये 13 भाडेकरू राहत होते. मात्र, ही इमारत मोडकळीस आल्याने काही कुटुंब घर बंद करून इतरत्र राहण्यासाठी निघून गेले होते.

सफी अन्सारी हे आपल्या कुटुंबासह या इमारतीत राहत होते. आज इमारतीच्या छताचा स्लॅब कोसळत असल्याचे त्यांच्या नजरेस पडताच सफी आपल्या कुटुंबासह जिवाच्या आकांताने बाहेर पडले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच प्रभाग अधिकारी व स्थानिक नगरसेवक घटनास्थळी तत्काळ पोहचले. त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने मदतकार्यास सुरुवात केली. दुर्घटनेत विस्थापित झालेल्या कुटुंबाची लगेच इमारत आणि पालिकेच्या शाळेत तात्पुरती राहण्याची व्यवस्था पालिका प्रशासनाने केली आहे.

महापालिका क्षेत्रात पाच वर्षापासून धोकादायक इमारतींची संख्या बेसुमार वाढली आहे. सुमारे 978 धोकादायक इमारती असल्याचे समोर आले आहे. या इमारतींमध्ये 2 हजार 460 कुटुंब राहत असून सुमारे 15 हजार नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दोन वर्षात भिवंडीत विविध ठिकाणी इमारती कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. या इमारत दुर्घटनांची दखल घेऊन राज्य शासनाने अनधिकृत व धोकादायक इमारती पाडून टाकण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत. मात्र, पालिकेच्या अनाधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त दीपक कुरळेकर हे राज्य शासनाचे प्रतिनिधी असल्याने येथे गेल्या पाच वर्षापासून एका जागेवर बसून कागदी घोडे नाचवून कारवाई झाल्याचे दाखवत असल्याची टीका भाजपचे गटनेते निलेश चौधरी यांनी केली आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:भिवंडीत एक मजली धोकादायक इमारत कोसळली; पालिका क्षेत्रात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

ठाणे :- भिवंडी महापालिका क्षेत्रातील इस्लामपुरा भागात आज दुपारच्या सुमारास एक मजली धोकादायक इमारत अचानकपणे कोसळल्याची घटना घडली आहे , या घटनेने परिसरातील रहिवाशांनी मध्ये एकच धावपळ उडाली होती, सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे , या घटनेने पालिका शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे,

या संभवित घटनांमुळे सतर्क झालेल्या पालिका आयुक्त अशोक कुमार कारखान्यांनी शहरातील प्रभाग अंतर्गत असलेल्या अनधिकृत व धोकादायक इमारती ची माहिती प्रभाग अधिकाऱ्याकडून तातडीने मागवली आहे असे असतानाच महापालिका प्रशासकीय कार्यालयालगत इस्लामपूर येथील शकीना हाजी इंन्सनबी मियाजी यांच्या मालकीची ही धोकादायक असलेली एक मजली इमारत दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानकपणे कोसळून दुर्घटना घडली आहे, या इमारतीमध्ये 13 भाडेकरू राहत होते, मात्र ही इमारत मोडकळीस आल्याने काही कुटुंब घर बंद करून इतरत्र राहण्यासाठी निघून गेले होते , मात्र सफी अन्सारी हा आपल्या कुटुंबासह राहत होता,आज इमारतीच्या छताची स्लॅब कोसळत असल्याचे त्याच्या नजरेस पडतात सफी हा आपल्या कुटुंबासह जिवाच्या आकांताने बाहेर पडला , त्यामुळे सदैवने कोणतीही जीवित हानी झाली नाही, या घटनेची माहिती मिळताच प्रभाग अधिकारी व स्थानिक नगरसेवक हे घटनास्थळी तत्काळ पोचून त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने मदत कार्यास सुरुवात केली, तर दुर्घटनेत विस्थापित झालेल्या कुटुंबाची लगेच इमारत आणि पालिकेच्या शाळेत तात्पुरती राहण्याची व्यवस्था पालिका प्रशासनाने केली आहे,
दरम्यान पालिका क्षेत्रात गेल्या पाच वर्षापासून धोकादायक इमारतींची संख्या बेसुमार वाढली आहे, सुमारे 978 धोकादायक इमारती असल्याचे पालिकेच्या संरक्षणात उघड झाले आहे, या इमारतीमध्ये 2, 460 कुटुंब राहत असून सुमारे 15 हजार नागरिकांच्या जीवाचा धोका निर्माण झाला आहे, गेल्या दोन वर्षात भिवंडीत विविध ठिकाणी इमारती कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला तर 30 जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत, या इमारत दूर घटनांची दखल घेऊन राज्य शासनाने अनधिकृत व धोकादायक इमारती पाडून टाकण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहे मात्र पालिकेच्या अनाधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त दीपक कुरळेकर हे राज्य शासनाचे प्रतिनिधी असल्याने येथे गेल्या पाच वर्षापासून एका जागेवर बसून कागदी घोडे नाचवून कारवाई झाल्याचे दाखवत असल्याची टीका भाजपचे गटनेते निलेश चौधरी यांनी केली आहे,
ftp foldar - tha, bhiwandi binding collapse 18.7.19

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.