ETV Bharat / city

फेसबुकवरील कमेंटच्या वादातून उल्हासनगरमध्ये दोन गटात तुफान राडा; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - clash between two groups at Ulhasnagar

उल्हासनगर भागात फेसबुकवरील कमेंटच्या वादातून दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली. ही मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. दोन्ही गटातील सदस्यांवर उल्हासनगर पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

clashes between Two groups  on Facebook comments
फेसबुकवरील कमेंटच्या वादातून ठाण्यात दोन गटात तुफान राडा
author img

By

Published : Jan 1, 2020, 6:18 PM IST

Updated : Jan 1, 2020, 9:18 PM IST

ठाणे - शहरातील उल्हासनगर भागात नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या तयारीत असलेल्या एका गटाने फेसबुकवरील कमेंटच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण केली. याला प्रत्युत्तर देताना मारहाण झालेल्या मुलाच्या बाजूच्या गटातील महिलांनी मारहाण केलेल्या गटातील मुलांच्या नेत्यांच्या कार्यालयावर हल्ला केला. यात कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर उल्हासनगर पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुकवरील कमेंटच्या वादातून ठाण्यात दोन गटात तुफान राडा...

हेही वाचा... भरधाव आलिशान कार विहिरीत पडली; दोघांचा मृत्यू, तीन जखमी

फेसबुकवरील कमेंटच्या वादातून मारहाण करणारे मुले ही, ओमी कलानी यांचे समर्थक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच मारहाण केलेल्या मुलाच्या गटातील सदस्यांनी ओमी कलानी यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.
यात प्रथम मारहाण करणाऱ्या गटातील सदस्यांवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसऱ्या गटातील ४ महिला आणि ६ ते ७ मुलांनी मिळून माजी आमदार ज्योती कलानी व ओमी कलानी यांच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी त्यांच्यावरही उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा... काश्मीरमध्ये सरसकट मोबाईल एसएमएस सेवेसह सरकारी रुग्णालयातील इंटरनेट पूर्ववत

सुंदर मुदलियार, मनीष हिंगोरानी, दिपू निशाद, नरेश साळवे, अविनाश बिरारे, गुरमितसिंग गुलवान असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ओमी कलानी बाजुच्या समर्थकांची नावे आहेत. तर कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी शोभा गमलाडू, संध्या, सागर, रोहित आणि ५ ते ६ अनोखळी व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा... ...म्हणून समृद्धी महामार्गाच्या बांधकाम कंत्राटदार कंपनीला 238 कोटींचा दंड

नेमके काय घडले ?

प्राथमिक माहितीनुसार सागर गमलाडू हा घरासमोरच नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करत होता. त्यावेळी अचानक ओमी कलानी यांचे समर्थक या ठिकाणी येऊन सागरला 'तू हमारे भाई के फोटो मे क्या कमेंट किया', असा जाब विचारला. त्यावेळी बाचाबाची होऊन सागराला ओमी कलानींच्या ६ समर्थकांनी बेदम मारहाण केली. त्यांनतर मारहाणीची माहिती गमलाडू कुटुंबाला लागताच त्यांनी गोलमैदान परिसरातील माजी आमदार ज्योती कलानी व ओमी कलानी यांच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली. याघटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, दोन्ही गटांनी एकमेकांवर गुन्हे दाखल केले असून उल्हासनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Intro:kit 319Body:फेसबुकवरील कमेंटच्या वादातून दोन गटात राडा; दोन्ही गटाकडून गुन्हे दाखल

ठाणे :नवीन वर्षाच्या स्वागत करण्याच्या तयारीत असलेल्या एका गटाने फेसबुकवरील कमेंटच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यांनतर मारहाण झालेल्या तरुणाच्या गटातील महिलांनी त्यांच्या नेत्यांच्या कार्यलयवर हल्ला करून तोडफोड केल्याची घटना उल्हासनगर घडली आहे.
विशेष म्हणजे फेसबुकवरील कमेंटच्या वादातून राडा घालणारे टीम ओमी कलानीचे समर्थक असून त्यांच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसऱ्या गटातील ४ महिला आणि ६ ते ७ जणांनी मिळून माजी आमदार ज्योती कलानी व ओमी कलानी यांच्या कार्यलयवर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी त्यांच्यावरही उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुंदर मुदलियार , मनीष हिंगोरानी, दिपू निशाद , नरेश साळवे, अविनाश बिरारे , गुरमितसिंग गुलवान असे गुन्हा दाखल झालेल्या टीम ओमी कलानी समर्थकांचे नावे आहेत. तर कार्यलयाची तोडफोड केल्याप्रकरणी शोभा गमलाडू , संध्या, तिची आई मुलगा सागर, रोहित आणि ५ ते ६ अनोखळी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार सागर गमलाडू हा घरासमोरच नवीन वर्षाच्या स्वागताची तयारीकरीत होता. त्यावेळी अचानक टीम ओमी कलानीचे समर्थक या ठिकाणी येऊन सागरला तू हमारे भाई फोटो क्या कमेंट किया , असा जाब विचारला असता दोघांमध्ये बाचाबाची होऊन सागराला टीम ओमी कलानीच्या ६ समर्थकांनी बेदम मारहाण केली. त्यांनतर मारहाणीची खबर गमलाडू कुटुंबाला लागताच त्यांनी गोलमैदान परिसरातील माजी आमदार ज्योती कलानी व ओमी कलानी यांच्या कार्यलयवर हल्ला करून तोडफोड केली .याघटनेचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
दरम्यान, दोन्ही गटांनी परस्पर एकमेकांवर गुन्हे दाखल केले असून उल्हासनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Conclusion:ulhasnagr
Last Updated : Jan 1, 2020, 9:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.