मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्यवर एका महिला कोरिओग्राफरने गणेश आचार्य तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यापासून वंचित ठेवत आहे. तसेच कामासाठी तिच्याकडून कमिशन देखील मागत आहे. इतकेच नाही तर, गणेश आचार्य तिला अडल्ट सिनेमे पाहण्यासही भाग पाडत आहे, असा आरोप केला होता. या प्रकरणात ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये गणेश आचार्य यांच्या विरोधात 354 (B) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आज ओशिवरा पोलिसांनी गणेश आचार्यसह अन्य दोघांविरोधात दोषारोप पत्र ( Chargesheet filed against Choreographer Ganesh Acharya ) अंधेरी कोर्टात दाखल केले आहेत. गणेश आचार्य सध्या जामिनावर आहे.
हेही वाचा - Paswan Bungalow In Delhi Was Vacated : चिराग पासवान यांनी वडिलांचा दिल्लीतील बंगला केला खाली
कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि त्याच्या सहाय्यकाविरुद्ध अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गणेश आचार्य विरुद्ध कलम 354 बी अंतर्गत ओशिवरा पोलीस ठाण्यात 2020 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 33 वर्षीय महिला नृत्यदिग्दर्शकाने भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन नृत्य दिग्दर्शक संघटनेचे सरचिटणीस गणेश आचार्य यांच्याविरोधात राज्य महिला आयोग आणि आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिने सिने इंडस्ट्रीत काम नाकारणे, कमाईतून कमिशन मागणे आणि अल्डट मुव्ही पाहण्यास भाग पाडणे, असे गंभीर आरोप आचार्यवर केले होते.
हेही वाचा - Controversial Decision:आमदारांच्या घरांवरून महाविकास आघा़डीत शिवसेनेची कोंडी