ETV Bharat / city

भिवंडी : वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात सशस्त्र दरोडा, १५ लाख लंपास

सशस्त्र दरोडा पडल्याने मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज  मंदिर बंद ठेवण्यात आल्याने मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली आहे.

वज्रेश्वरी देवी मंदिर
author img

By

Published : May 10, 2019, 5:21 PM IST

ठाणे - भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडली. चोरांनी दानपेटीतून सुमारे १० ते १५ लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. दरम्यान, दरोड्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

वज्रेश्वरी देवी मंदिरातील सशस्त्र दरोडा

वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात सशस्त्र दरोडेखोरांनी एका सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करून त्याचे हात पाय बांधून ठेवले. त्यानंतर मंदिरात प्रवेश करून दानपेट्या फोडून १० ते १५ लाख रुपयांची रोकड लंपास केली. मंदिरातील चोरीच्या घटनेने वज्रेश्वरी गावामध्ये संतापाची लाट पसरली आहे. ग्रामस्थांनी निषेध म्हणून बंद पुकारला आहे. यापूर्वीदेखील चोरट्यांनी तीन ते चार वेळा मंदिराच्या दानपेट्या फोडल्या होत्या. तरीदेखील सशस्त्र दरोडा पडल्याने मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज मंदिर बंद ठेवण्यात आल्याने मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली आहे.

भिवंडी तालुक्यातील  सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या  वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात सशस्त्र दरोडा, घटना सीसीटीव्हीत कैद 

  ठाणे :- भिवंडी तालुक्यातील  सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या  वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात मध्यरात्री  3 च्या सुमारास सशस्त्र दरोडा घालण्यात आला.दरोडेखोरांनी मंदिरातील सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करून मंदिरातील  दानपेट्या फोडून चोरी करून चोरटे  फरार झाले असून संतप्त ग्रामस्थांनी याच्या निषेधार्थ  गाव बंद ची हाक दिली आहे. तर दरोड्यांचा प्रकार सीसीटीव्ही त कैद झाला 
 मध्यरात्रीच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेल्या वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात सशस्त्र दरोडेखोरांनी एका सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करून त्याचे हात पाय बांधून ठेवले व मंदिरात प्रवेश करून दान पेट्या फोडून 10 ते 15 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे यामुळे वज्रेश्वरी गावामध्ये संतापाची लाट पसरली असून ग्रामस्थांनी गाव निषेध म्हणून संपूर्ण गाव बंद  करण्यात आले या आगोदर देखील तीन ते चार वेळा  मंदिराच्या दान पेटया फोडण्यात आले होते यामुळे या मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.आज  मंदिर बंद ठेवण्यात आल्या ने मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैर सोयी झाली होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.