ठाणे: पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक अनुबाई ह्या कल्याण तालुक्यातील घोटसई गावात राहत होत्या. त्या कल्याण - मुरबाड मार्गावरील गोवेली हद्दीत वडा पाव व चहा कॅन्टीन चालवायच्या. २६ ते २७ जुलै दरम्यान त्यांना त्यांचे कल्याण तालुक्यातील पिसवली गावात रहाणारे जावाई बाळाराम गजानन भोईर (वय ४५) हे मोबाईलवर सतत संर्पक करीत होते. मात्र त्यांचा मोबाईल बंद येत असल्याने त्यांनी मावस मेव्हणा भास्कर परतोळे यांना संपर्क करुन सासू अनुबाईचा मोबाईल बंद असून तुम्ही कॅन्टीनवर जाऊन चौकशी करा असे सांगितले. त्यानुसार भास्कर २७ जुलै रोजी कॅन्टीनवर गेला असता, अनुबाई रक्ताच्या थारोड्यात नीचपत पडल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती कल्याण तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छदेना साठी शासकीय रुग्णालयात रवाना केला . तर जावई बाळाराम गजानन भोईर यांच्या फिर्यादीवरून कल्याण तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम 302 आणि 201 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींचा तपास सुरू केला. मात्र या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी करीत आहेत.