ETV Bharat / city

नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या बोगस पत्रकाराला अटक

author img

By

Published : Jul 29, 2021, 10:27 PM IST

पत्रकार असल्याचे सांगून, भिवंडी शहरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेशी ओळख निर्माण केली. त्यांनतर या महिलेला नोकरी लावून देतो असे अमिष दाखवले. त्यानंतर या अमिषाखाली त्या महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधीत व्यक्तीवर नारपोली पोलीस ठाण्यात अत्याचारासह अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे.

नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या बोगस पत्रकाराला अटक
नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या बोगस पत्रकाराला अटक

ठाणे - एका व्यक्तीने पत्रकार असल्याचे सांगून, भिवंडी शहरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेशी ओळख निर्माण केली. त्यांनतर या महिलेला नोकरी लावून देतो असे अमिष दाखवले. त्यानंतर या अमिषाखाली त्या महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधीत व्यक्तीवर नारपोली पोलीस ठाण्यात अत्याचारासह अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे. मनोहर विशे (वय 35, रा. पुर्णा, भिवंडी ) असे अटक केलेल्या बोगस पत्रकाराचे नाव आहे.

ओळखीतून पीडिता पडली अमिषाला बळी

भिवंडी तालुक्यातील पुर्णा येथे राहणारा मनोहर विशे हा ग्रामीण भागात पत्रकार म्हणून गेल्या काही वर्षांपासून वावरतो. त्यातच २०१६ साली एका ३५ वर्षीय महिलेशी त्याची ओळख निर्माण केली. त्यांनतर तुला नोकरी लावून देतो, तसेच तुझ्याशी लग्न करतो असे आमिष देवून या महिलेवर बलात्कार केला.

आरोपीला पोलीस कोठडी

गेल्या काही दिवसांपासून महिलेने या व्यक्तीकडे नोकरी व लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र, त्याने लग्नास नकार देऊन महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. दसेच, तीला धमकीही दिली. यामुळे भयभीत झालेल्या पीडितेने नारपोली पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रर दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी मनोहरविरोधात अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काळ मनोहर विशे याचा शोध घेऊन त्याला काल रात्री अटक केली आहे. आरोपीला आज भिवंडी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ३१ जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले करीत आहेत.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.