ETV Bharat / city

लसीकरण केंद्रात भाजप - शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी - BJP Shiv Sena activists clash

लसीकरणाच्या वादतून भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही घटना बदलापूर-कुळगाव नगर पालिकेच्या दुबे रुग्णालयात घडली. हा हाणामारीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

BJP Shiv Sena activists clash Dubey Hospital
भाजप शिवसेना कार्यकर्ते हाणामारी दुबे रुग्णालय
author img

By

Published : Jul 7, 2021, 10:37 PM IST

ठाणे - लसीकरणाच्या वादतून भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही घटना बदलापूर-कुळगाव नगर पालिकेच्या दुबे रुग्णालयात घडली. हा हाणामारीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

हाणामारीचे दृश्य

हेही वाचा - आदित्य बिर्ला समूहाच्या कंपनी विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

राजकीय श्रेयातून हाणामारी..

काही महिन्यांत बदलापूर कुळगाव नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूर शहरात सध्या लसीकरण केंद्रांवर सर्वच राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळते आहे. सेना- भाजप कार्यकर्त्यांमध्ये अशाच लसीकरणाच्या वादातून पालिकेच्या दुबे रुग्णालयात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एका कार्यकर्त्याने दुसऱ्याच्या डोक्यात लाकडी बेंच टाकला. त्यात एक जण जखमी झाला आहे.

परस्परविरोधी गुन्हे दाखल..

याप्रकरणी भाजप - शिवसेना कार्यकर्त्यांकडून बदलापूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, अशा प्रकारे लसीकरणावरून राजकीय संघर्ष यापुढेही वाढत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा - एल्गार परिषद : आरोपींचे तळोजा जेलमध्ये आंदोलन; जेलर यांच्याकडून वृत्ताचे खंडण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.