ETV Bharat / city

आमदार मिटकरींच्या 'त्या' वक्तव्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार - आमदार मिटकरी तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी ( Mla Mitkari complaint in National Womens Commission ) यांनी सांगलीच्या सभेत कन्यादानाबद्दल जे वक्तव्य केले होते त्याविरोधात आता भाजपने राष्ट्रीय महिला आयोगात धाव घेतली आहे.

MLA Mitkari complaint by bjp
आमदार मिटकरी तक्रार
author img

By

Published : Apr 25, 2022, 8:07 AM IST

ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी ( Mla Mitkari complaint in National Womens Commission ) यांनी सांगलीच्या सभेत कन्यादानाबद्दल जे वक्तव्य केले होते त्याविरोधात आता भाजपने राष्ट्रीय महिला आयोगात धाव घेतली आहे. भिवंडीतल्या भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्या नीता वैभव भोईर यांनी राष्ट्रीय महिला आयोगात मिटकरींविरोधात ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे.

माहिती देताना नीता भोईर
MLA Mitkari complaint by bjp
तक्रार

हेही वाचा - Moon Land Cheating : चंद्रावर जमीन घेणाऱ्या विकासकासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मंत्री जयंत पाटील आणि धनंजय मुडेंवरही कारवाईची मागणी - आमदार अमोल मिटकरींनी केलेले वक्तव्य हे समस्त महिला वर्गाचा अपमान करणारे आणि हिंदू धर्माची खिल्ली उडवणारे आहे. त्यामुळे याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या नीता भोईर यांनी केली. मिटकरी भाषण करत असताना पाठीमागे बसलेले मंत्री जयंत पाटील आणि धनंजय मुंडे हे हासून त्यांच्या वक्तव्याला दुजोरा देत असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी भोईर यांनी केली आहे. आमदार अमोल मिटकरींचे वक्तव्य हिंदूंच्या आणि महिलावर्गाच्या भावना दुखावणार असून त्यांच्यावर भा.दं.वि च्या कलम 354, 509 अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी नीता भोईर यांनी केली.

हेही वाचा - VIDEO : अमोल मिटकरींनी ब्राम्हण समाजाची माफी मागावी; परशुराम सेवा संघाची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.