ETV Bharat / city

कौटुंबिक छळाला कंटाळून पलायन केलेल्या दोघी पालकांच्या स्वाधीन

कौटुंबिक छळाला कंटाळून गुजरातला पलायन केलेल्या दोन तरुणींना भोईवाडा पोलिसांनी सुखरूपपणे पालकांच्या स्वाधीन केले आहे. कुटुंबीयांकडून सतत पैशाची मागणी होत असल्याने त्यांनी पलायन करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले.

author img

By

Published : Dec 5, 2019, 8:15 AM IST

bhiwandi police returned 2 daughters to their parents
कौटुंबिक छळाला कंटाळून पलायन केलेल्या दोघी पालकांच्या स्वाधीन

ठाणे - कौटुंबिक छळाला कंटाळून गुजरातला पलायन केलेल्या दोन तरुणींना भोईवाडा पोलिसांनी सुखरूपपणे पालकांच्या स्वाधीन केले आहे. साजेदा खातून मोहम्मद तय्यद शाह (वय-20) आणि रेशम खातून रहमान शाह (वय-21) या दोन्ही तरुणी भोईवाडा येथील रहिवासी आहेत. दोघीही नात्याने मावशी-भाची असून, माणकोली येथील इंटेक्स गारमेंट कंपनीत त्या कार्यरत होत्या.

कुटुंबीयांकडून सतत पैशाची मागणी होत असल्याने त्यांनी पलायन करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. तसेच पैशांच्या मागणीसाठी कुटुंबीयांकडून मारहाण होते. यामुळे दररोज होणाऱ्या छळाला कंटाळून या दोघींनी आठ दिवसांपूर्वी घर सोडले; आणि कामधंदा शोधण्यासाठी गुजरातला पळ काढला. यानंतर कुटुंबीयांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात मुली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

दोन्ही तरुणींच्या सुरक्षिततेला धोका असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी शोध मोहिमेसाठी विशेष पोलीस पथक नेमून शोधकार्य सुरू केले. या पथकातील पोलीस कर्मचारी अरविंद गोरले, निलेश महाले, ज्योती गायकवाड यांनी बेपत्ता मुलींकडे असलेल्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले. यामध्ये दोन्ही तरूणी सुरत शहरातील रावनगर, लिंबायत असल्याचे तपासात समोर आले. यानंतर पोलिसांनी दोघींना ताब्यात घेऊन बुधवारी (दि.04 डिसेंबर)ला सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले.

Intro:kit 319Body:कुटूंबियाने अधिक पैश्यांची मागणी केल्याने पलायन करणाऱ्या २ तरुणींना पोलिसांनी केले कुटुंबियांच्या स्वाधीन

ठाणे : कौटूंबिक छळाला कंटाळून आणि कुटूंबियाने अधिक पैश्यांची मागणी केल्याने गुजरातच्या सुरत शहरात पलायन केलेल्या २ तरुणींची भिवंडीतील भोईवाडा पोलिसांनी पोलिसांनी कसून शोध घेऊन त्यांना सुखरूपपणे आणून त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले आहे.
साजेदा खातून मोहम्मद तय्यद शाह ( २० ) व रेशम खातून रहमान शाह ( २१ ) या दोघी नात्याने मावशी व भाची असून भोईवाडा पोलीस ठाण्याच्या परिसरात वास्तव्यास होत्या. तसेच या तरुणींनी तालुक्यातील माणकोली येथील इंटेक्स गारमेंट कंपनीत कामाला होत्या. त्या काम करीत असताना कुटूंबीय त्यांच्याकडून जास्त पैशाची अपेक्षा करीत होते. या मुली जास्त पैसे देण्यास असमर्थ ठरल्याने आईवडील या दोन्हीं मुलींशी सतत भांडण करून त्यांना मारहाण करीत होते. त्यामुळे दररोज होणाऱ्या छळाला कंटाळून या दोघीनी आठ दिवसांपूर्वी घर सोडून स्वतःचा कामधंदा शोधण्यासाठी गुजरात येथील सुरत येथे पळून गेल्या होत्या. त्यामुळे घरातील शाह कुटूंबियांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन सदर मुली हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
दोन्हीं मुली तरुण असल्याने त्यांच्यासोबत काही बरेवाईट होण्याचा धोका असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी या मुलींच्या शोधासाठी विशेष पोलीस पथक नेमून शोधकार्य सुरु केले होते. या पोलीस पथकातील पोलीस नाईक अरविंद गोरले ,निलेश महाले ,महिला पोलीस नाईक ज्योतीताई गायकवाड यांनी बेपत्ता मुलींकडे असलेल्या मोबाईलचे सीडीआर तपासून त्या सुरत शहरातील रावनगर ,लिंबायत येथे एका भाड्याच्या खोलीत राहत असल्याचे आढळून आले आहे. या दोन्हीं मुलींना पोलीस पथकाने मंगळवारी ताब्यात घेऊन ते भिवंडीत परतले व बुधवारी या मुलींना त्यांच्या कुटूंबियांच्या स्वाधीन केले आहे. या मुलींना सुखरूप आपल्याकडे आल्याचे पाहून मोहमद तय्यब शाह यांच्या डोळ्यात अश्रु तरळले आणि त्यांनी पोलिसांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.