ETV Bharat / city

भिवंडीत वीज चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल - शांतीनगर पोलीस स्टेशन न्यूज

कोरोनाच्या काळात ग्राहकांकडे थकबाकीची मोठी रक्कम राहिल्याने वीज कंपन्या आर्थिक अडचणीत आहेत. अशा स्थितीत कंपनीने वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

शांतीनगर पोलीस स्टेशन
शांतीनगर पोलीस स्टेशन
author img

By

Published : Feb 17, 2021, 9:18 PM IST

ठाणे - शहरात वीज पुरवठा करणाऱ्या टोरंट पावर कंपनीने वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. कंपनीने वीज चोरी प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरशद मोहंमद हसन अंसारी व मोहंमद शाहिद मोहंमद हसन अंसारी ( दोघे राहणार नवीन गौरीपाडा, भिवंंडी ) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

कोरोनाच्या काळात ग्राहकांकडे थकबाकीची मोठी रक्कम राहिल्याने वीज कंपन्या आर्थिक अडचणीत आहेत. अशा स्थितीत कंपनीने वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा-'कोरोनाच्या नावावर राज्य सरकार अधिवेशन गुंडाळणार'

वीज मीटरचे सील तोडून वीज चोरी...
गुन्हा दाखल झालेल्या दोघांनी वीज मीटरचे सील तोडून कॉपर लिंक लावले. त्यानंतर १ मार्च २०२० ते १ डिसेंम्बर २०१० या काळात सुमारे ९,४०४ युनिटची १ लाख ६७ हजार ९३७ रुपयांची वीज चोरी केली. या दोघांविरोधात वीज चोरी प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक रवींद्र पाखरे करीत आहेत.

हेही वाचा-मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपाबाबत मुख्यमंत्र्यांनी संवेदनशील होऊन निर्णय घ्यावेत - तावडे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.