ठाणे - ठाण्यातील 9 पर्यटकांच्या मृत्यूनंतर आता टूरसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्थांचा प्रश्न गंभीर असल्याचे समोर आले आहे. या टूर्सवर जाताना कोण कोणत्या गोष्टी कराव्यात आणि करू नयेत याची माहिती प्रत्येक पर्यटकांनी घेणे गरजेचे आहे. नुसते एवढे नाही स्वतः टूर काढण्यापेक्षा अनुभव संपन्न असलेल्या कंपन्यांकडुनच पॅकेज घेण्याचे आवाहन, ठाण्यातील टूर तज्ज्ञ करत ( be careful when going tour ) आहेत.
नेपाळ येथील विमान अपघातात ठाण्यातील 4 पर्यटकांचा मृतदेह ही अजून मिळालेला नाही. तर, सिक्कीम येथे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 ठाणेकरांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये एक आख्खे कुटुंब मृत्युमुखी पडले. या दोन्ही टूर या अनुभवी ऑपरेटरकडून आयोजित झाल्या असत्या, तर हे अपघात घडले नसते, असे ठाण्यातील टूर ऑपरेटर सांगत आहेत.
तज्ज्ञांनी सांगितले की, भारतातील अनेक भागात डोंगराळ भाग बर्फाच्छादित प्रदेश, नागमोडी वळणे, निसरडे रस्ते आहेत. त्यामुळे या भागात प्रवास करताना अनुभवी स्थानिक चालक असणे गरजेचे असते. त्यासोबत टीम लिडरचा सल्ला महत्वाचा असल्याची गरज असते.
टूरवर संध्याकाळच्या आधी निवासस्थान गाठावे - आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी टूरवर जातो. तेव्हा तेथील परिस्थिती तिथली माहिती पर्यटकांना नसते. त्यामुळे अनुभवी जाणकारांचा सल्ला महत्वाचा असतो. म्हणून सकाळी लवकर उठून टूर सुरू करत दिवस मावळण्यापूर्वी निवासस्थान गाठणे गरजेचे असते, असेही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
पर्यटक घालतात जीव धोक्यात - अनेकदा फोटो काढण्याच्या बहाण्याने पर्यटक नियमांचे उल्लंघन करत फोटो काढण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालत असतात. त्यामुळे फोटो काढण्यापेक्षा पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षेकडे लक्ष देणे गरजचे असल्याचे जाणकार सांगत आहेत. ठाण्यात 27 वर्षे देशात आणि विदेशात टूर्सचे आयोजन करणाऱ्या जाणकार संतोष साळुंके यांनी नागरिकांना स्वतः टूर्स न काढता जाणकारांच्या मदतीने टूर्सला सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करत आहेत.
प्रवासात घेण्याची काळजी - जर आपण एक दूरचा प्रवास करत आहात आणि त्यासाठी वाहनाचा वापर करत असाल तर संचालकाची विशेष काळजी घ्यावी. त्याला झोप लागू नये यासाठी सतत त्याच्याशी बोलत राहावे. त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून आवश्यकता पडल्यास ब्रेक घेण्याची विनंती देखील करावी. रात्रीच्या वेळेस सहसा वाहनांचा प्रवास टाळावा आणि पर्याय नसेल तरच अनोळख्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेऊनच प्रवास करावा. अवघड जागी वाहनाचा प्रवास शक्यतो दिवसात करावा, कारण मोठी वळणे असलेला भाग हा आपल्या वाहनाच्या अपघातास कारणीभूत ठरू शकतो आणि म्हणूनच दिवसा शक्यतो प्रवास करावा.
प्रवासात द्या 'या' गोष्टींकडे लक्ष -
- घराच्या बाहेर निघताना हलके जेवण करून निघा.
- प्रवासात जास्त तेलकट, मसालेदार पदार्थ उदा. - पुरी, पराठे, समोसा, कचोरी इत्यादी टाळावे.
- जास्त चहा, कॉफी किंवा शीतपेये घेणे टाळावे.
- शिळे अन्न खाणे टाळावे.
- पिण्याचे पाणी नेहमी आपल्या सोबत ठेवावे.
- ताज्या फळांचे सेवन करावे. कापलेले फळ विकत घेऊ नये.
- शीतपेयांऐवजी सीलबंद ज्यूस घ्यावा.
- काही आवश्यक औषधांच्या गोळ्या आपल्या सोबत ठेवाव्यात आणि इलेक्ट्रॉल पावडर, ग्लूकोज, पुदिनहरा, लिंबू इत्यादी आपल्याजवळ असावे.
- प्रवासात आपल्याजवळ ताजा ब्रेड, जॅम (पाऊच), बिस्किट, कुरमुरे, फुटाणे, भाजके दाणे, गुळ सारख्या वस्तू ठेवाव्या.
- हे पदार्थ भूक लागल्यावर कामी पडतील आणि पोषकसुद्घा असतात.
- व्हेजिटेबल सँडविचचा उपयोग जेवताना करावा. यासाठी टोमॅटो, काकडी, लिंबू, मीठ, चाकू इत्यादी जवळ ठेवावे. जेवण एकाच वेळेस न करता थोड्या थोड्या वेळाने करावे.
हेही वाचा - लक्षणे नसलेल्या कोविड-19 मुळे अजूनही गर्भधारणेचा धोका : अभ्यास