ठाणे - लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर अत्यावश्यक वाहने धावत आहेत. तरी या तुलनेत खासगी वाहनेचे जास्त प्रमाणावर रस्त्यावर धावताना दिसतात. लॉकडाऊनच्या काळात अनेक रुग्णवाहिका रुग्णांना घेऊन जात असतात. बुधवारी दुपारच्या सुमारास कॅडबरी जंक्शनजवळ अशाच एका रुग्णवाहिकेला खासगी वाहनाने धडक दिल्याने रुग्णवाहिकेचा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले.
हेही वाचा... भाजप नगरसेवकाच्या घरात रंगला पत्त्यांचा डाव; १२ जण ताब्यात
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात आले आहे. असे असतानाही काही नागरिक आपल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनातून घराबाहेर पडत आहेत. त्यामुळेच ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे बुधवारी दुपारी एका रुग्णवाहिकेचा अपघात झाला. ही रुग्णवाहिका कल्याणहुन मुंबईच्या दिशेने एका रुग्णाला घेऊन जात असताना कॅडबरी जंक्शन येथे सिग्नल तोडून जात असलेल्या चारचाकी वाहनाने रुग्णवाहिकेला धडक दिली.