ETV Bharat / city

१८ महिन्यांचे भाडे थकवल्याने बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयाला ठोकले टाळे

author img

By

Published : Oct 19, 2020, 7:11 PM IST

पुनर्वसनाच्या नावाखाली बांधकाम व्यावसायिकांनी म्हाडाच्या इमारती खाली करण्यात आल्या. मात्र, याबदल्यात देण्यात येणारे भाडे व्यावसायिकांनी अद्यापही दिलेले नाहीत. याचविरोधात स्थानिकांनी त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले आहेत.

वर्तक नगर
वर्तक नगर

ठाणे - शहरातील वर्तक नगर परिसरातील म्हाडाच्या इमारती पुनर्वसनाच्या नावा खाली इमारत व्यावसायिकांनी खाली केल्या. त्यावेळी स्थानिक रहिवाशांना महीना घर भाडे देणार, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, गेल्या १८ महिन्यापासून ही भाडी थकवल्याने, आज शेकडो नागरिक रस्त्यावर आले. तसेच बांधकाम व्यावसायिक पुराणिक आणि एकदंत यांचे कार्यालय बंद करत व्यावसायिकांच्या विरोधात घोषणा बाजी केली.

वर्तक नगर स्थानिकांचे आंदोलन

एकीकडे लॉकडाऊनमध्ये अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तर दुसरीकडे उपासमारीची वेळ सध्या या बेघर लोकांवर आलेली आहे. सरकारने अशा इमारत व्यावसायिकांवर कारवाई करून सामान्य जनतेचे पैसे द्यावे, अशी मागणी करत आज म्हाडाच्या रहिवाशांनी आंदोलन करत आपली व्यथा मांडली आहे.

या परिसरात म्हाडाच्या पुनर्वसनासाठी अनेक इमारती पाडण्यात आल्या आहेत. मात्र, या इमरातींमध्ये राहणाऱ्या लोकांना इतरत्र राहाण्यासाठी भाडे देणार असल्याचे कबुल करण्यात आले होते. यापुर्वी नोटाबंदी आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे अनेक व्यावसायिक अडचणीत आले आहेत. अशा वेळी हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा - 'साहेब एवढ्यात काय होणार?'...नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.