ठाणे - मागील दोन वर्षांपासून कोरोना काळात बंद असलेल्या शाळा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात नियमितपणे सुरू होतील. कोरोना महामारीत हरवलेला वह्या पुस्तकातील पानांचा हवाहवासा वाटणारा गंध आता ठाण्यातील बाजारपेठेत शालेय साहित्यांच्या ( School stationery Thane ) दुकानातून दरवळू लागला आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे गणवेशाच्या कोरा करकरीत ( price Rise of school uniforms ) स्पर्शाला मुकलेले चिमुकले यंदा ऑफलाइन शिक्षणामुळे प्रत्यक्ष गणवेश घालून रूबाबात शाळेत प्रवेश करणार आहेत. यंदा गणवेशाच्या किंमतीत पण पाच ते दहा टक्के वाढ झाली असून ज्यूनियर, सिनियर गणवेश ४५० रू तर मोठ्या मुलांचा ड्रेस ५०० रू असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
मागील दिड महिन्यांपासून उन्हाळी सुटीमुळे बंद असलेल्या शाळा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात उघडणार आहेत. तर सीबीएससी इंग्रजी माध्यमाच्या शाळा जूनच्या पहिल्या आठवड्यात उघडणार असून दोन वर्षांनंतर शालेय साहित्य खरेदी करण्यात पालक विद्यार्थी यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. ही गोष्ट आम्हा दुकानदारांसाठी सुखावह आहे. यंदा कागदाचे भाव वाढल्याने वही तसेच कॅमलिनच्या वाॅटर कलर संचामध्ये १० टक्के झाली आहे. तर पाठ्यपुस्तकांच्या किंमतीत वाढ झाली नसून २५ वर्षानंतर पाच रूपयांच्या पेनाची किंमत सात रूपये झाली असल्याची माहिती कुणाल विकमने दिली. दुसरीकडे मराठी शाळांचा अभिमान असणारी राजाची दगडी पाटी, पाटीवरील पेन्सिलचा बाॅक्सची शेकड्याने असणारी मागणीचे प्रमाण अगदीच घटले आहे.
यावर्षी चांगल्या व्यवसायाची संधी : कोरोनामुळे शाळा महाविद्यालये उघडण्याचे वेळापत्रक कोलमडले होते. याचा फटका अगदी पेन, पेन्सिल,खोडरबरपासून ते शालेय बॅग, टिफीन बाॅक्स, वाॅटर बाॅटल, गणवेश आदी वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना सोसावा लागला. मात्र यंदा मे अखेरीस ती पोकळी चांगली भरून निघाली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. मागील आठवड्यात पहिली ते आठवी इयत्तेतील जवळपास ४०० पुस्तक संचाची तर सात दिवसांत चार हजार वह्यांची विक्री झाली असल्याचे धीरज भाई विकम यांनी सांगितले आहे.
दगडी डबल पाटी विस्मरणात : मागील दोन वर्षांपासून विध्यार्थ्याच्या हातात आलेल्या मोबाइलमुळे लाकडी पाटी जवळपास दिसणे बंद झाली आहे. त्यामुळे पेन्सिल आणि पाटी या कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत. या पाटीवरून अनेकदा भांडणे देखील झालेल्या आठवणी अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना सांगत असतील. शाळा सुटली पाटी फुटली म्हण, देखील आता बोलताना ऐकू येणे बंद झाले आहे. यंदा बॉलपेनच्या किमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. कारण त्यांच्यावर असलेला जीएसटी कर हा 12 टक्क्यावरून 18 टक्के करण्यात आला आहे आणि त्यामुळे पेनाच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - International Film Festival : अडीच इंची मोबाईल स्क्रीन कलाकृतीला न्याय देऊ शकत नाही - अशोककुमार चटोपाध्यय