ETV Bharat / city

Action against rickshaw pullers : राज्यात ८ हजार ४९८ रिक्षा चालकांवर कारवाई, एक कोटी ४४ लाख रुपयांचा दंड वसूल - Action taken against 8 thousand 498 rickshaw pullers

जवळचे भाडे नाकारने, जादा प्रवासी, जलद मीटर, उद्धट वर्णन यासंबंधित दररोज यासंबंधित राज्यभरातून परिवहन विभागाला तक्रारी येतात. या तक्रारींवर रिक्षा चालकांवर आरटीओने विशेष मोहीम सुरु करुन कडक कारवाई करण्यात आली आहे. (Action taken against rickshaw puller) दरम्यान, दोषी रिक्षा चालकांमध्ये सर्वाधिक रिक्षा चालक हे ठाणे विभागातील आहेत.

राज्यात ८ हजार ४९८ रिक्षा चालकांवर कारवाई

author img

By

Published : Jan 25, 2022, 1:55 AM IST

मुंबई - रिक्षा चालकांची मुजोरी, जवळचे भाडे नाकारने, जादा प्रवासी, जलद मीटर, उद्धट वर्णन यासंबंधित दररोज यासंबंधित राज्यभरातून परिवहन विभागाला तक्रारी येतात. (Action taken against 8 thousand 498 rickshaw pullers) या तक्रारींवर रिक्षा चालकांवर आरटीओने विशेष मोहीम सुरु करुन कडक कारवाई करण्यात आली आहे. गेल्या नऊ महिन्यात ४१ हजार ३०२ रिक्षाची तपासणी करण्यात आली असून त्यातील ८ हजार ४९८ रिक्षा चालक दोषी आढळून आले आहेत. त्यांच्यावर परिवहन विभागाने कारवाई करत एक कोटी ४४ लाख रुपयांचा दंड आकाराला आहे. (Action taken against rickshaw puller) दरम्यान, दोषी रिक्षा चालकांमध्ये सर्वाधिक रिक्षा चालक हे ठाणे विभागातील आहेत.

सर्वाधिक कारवाई ठाणे विभागात -

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर बेशिस्तपणे उभी केलेली जाणारी रिक्षा, गणवेश परिधान न करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणारे अशा अनेक प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राज्यातील रिक्षा चालकांवर परिवहन विभागाकडून कारवाईचा बडगा उभारण्यात आलेला आहे. (Action taken against rickshaw puller In Thane) परिवहन विभागाने (आरटीओ) (एप्रिल ते डिसेंबर २०२१)या कालावधीत राज्यात तब्बल ४१ हजार ३०२ रिक्षाची तपासणी करण्यात आली असून त्यातील ८ हजार ४९८ रिक्षा चालक दोषी आढळून आले आहेत. त्यांच्यावर परिवहन विभागाने कारवाई करत एक कोटी ४४ लाख १० हजार रुपयांचा दंड आकाराला आहे. विशेष म्हणजे राज्यातील साडेआठ हजार कारवाई केलेल्या रिक्षामध्ये ३ हजार १६५ रिक्षा ठाणे विभागातील आहेत.

अशी आहे आकडेवारी -

परिवहन विभागाने (आरटीओ) एप्रिल ते डिसेंबर २०२१ या कालावधीत राज्यात तब्बल ८ हजार ४९८ रिक्षा चालकांवर विविध कारणांसाठी कारवाई केली आहे. ज्यामध्ये जादा भाडे आकाराने ४४१, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणारे २ हजार २०७, रिक्षाचे जलद मीटर ७१,प्रवासी भाडे नाकारणारे १४०, प्रवाशांबरोबर उद्धट वर्तन करणारे ७६ आणि इतर कारणासाठी ४ हजार १०६ असे ८ हजार ४९८ रिक्षाचालकांवर परिवहन विभागाने कारवाई केली आहे. याशिवाय २४२ रिक्षाचालकांवर परवाना निलंबन तर ४०९ चालकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईत ८१४ रिक्षा दोषी आढळल्या

मुंबई विभागातही रिक्षा चालकांकडून वाहतूक नियम उल्लंघन करण्याचे प्रमाण जास्त आहे. जादा भाडे, जादा प्रवासी, जलद मीटर, भाडे नाकारणे, उद्धट वर्णन इतकेच नव्हे तर रस्त्यावर बेशिस्तपणे उभी केलेली जाणारी रिक्षा, गणवेश परिधान न करणे अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई विभागात २ हजार ७८९ रिक्षांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ८१४ रिक्षा दोषी आढळल्या आहेत. यामध्ये ४२ परवाना निलंबन आणि ४८ अनुज्ञप्ती(वाहन चालवण्याचा परवाना) निलंबन केले आहे. तर १२ लाख १६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Balshakti Award 2022 : जवळगावच्या चिमुरडीला पंतप्रधानांच्या हस्ते बालशक्ती पुरस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.