ETV Bharat / city

physical abuse of girl in Kashi Express : काशी एक्क्प्रेसमध्ये ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न ; नराधमाला अटक - physical abuse of girl in Kashi Express

काशी एक्स्प्रेसमधील घडलेला सर्व प्रकार पीडितेच्या आईने पतीला सांगितला. त्यांनी कल्याण रेल्वे पोलिसांनी औरंगाबाद रेल्वे नियंत्रण कक्ष ( Aurangabad railway control ) आणि इगतपुरी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. इगतपुरी पोलिसांना ( Igatpuri Police ) मात्र काशी एक्क्प्रेस मुंबईच्या दिशेने निघून गेल्याने आरोपीला पकडता आले नसल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना दिली. मात्र काशी एक्स्प्रेस कल्याण रेल्वे स्थानकात आल्यावर प्रवाशांनी पकडलेल्या नराधम सोनुला पोलिसांच्या ( railway passengers beaten accused ) ताब्यात दिले.

कल्याण रेल्वे पोलीस
कल्याण रेल्वे पोलीस
author img

By

Published : Feb 18, 2022, 8:44 PM IST

ठाणे - धावत्या एक्क्प्रेसमध्ये एका ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकृत नराधमाला कल्याण रेल्वे पोलिसांनी ( minor girl physical abuse in Kashi express ) अटक केली आहे. काशी एक्सप्रेसमध्ये ( Kashi express ) पीडितेच्या आईने आरडाओरड केल्यावर प्रवाशांनी नराधमाला चोप दिला. त्यानंतर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. सोनू अशोक प्रजापती (२५, रा. उत्तरप्रदेश) असे नराधमाचे नाव आहे.

पीडित मुलगी झोपेत असताना घडला प्रकार
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधून १४ फेब्रुवारी रोजी काशी एक्सप्रेसमध्ये पीडितेची आई आपल्या चार मुलीबरोबर एका बोगीत बसून प्रवास करत होती. रात्रीच्या प्रवासात चारही मुले झोपल्याने आईलाही झोप लागली होती. हीच संधी साधून या बोगीतच प्रवास करणाऱ्या नराधम सोनूने पीडित मुलींवर अत्याचार करण्याच्या प्रयत्न केला. या घटनेने घाबरलेल्या पीडित मुलीने आईला प्रकार सांगितला. त्यानंतर बोगीतच पीडित मुलीच्या आईने नराधम सोनुला पकडून मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरडाओरड ऐकू आल्यावर इतर प्रवाशांनीही नराधमाला चागंलाच चोप दिला. त्यातच पीडित मुलीच्या आईने बदलापुरात राहणाऱ्या आपल्या पतीला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर १५ फेब्रुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला.

हेही वाचा-Sheena Bora Murder Case : इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्जावर प्रतिवाद्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस

नराधमाला प्रवाशांच्या मदतीने पोलिसाने घेतले ताब्यात
काशी एक्स्प्रेसमधील घडलेला सर्व प्रकार पीडितेच्या आईने पतीला सांगितला. त्यांनी कल्याण रेल्वे पोलिसांनी औरंगाबाद रेल्वे नियंत्रण कक्ष ( Aurangabad railway control ) आणि इगतपुरी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. इगतपुरी पोलिसांना ( Igatpuri Police ) मात्र काशी एक्क्प्रेस मुंबईच्या दिशेने निघून गेल्याने आरोपीला पकडता आले नसल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना दिली. मात्र काशी एक्स्प्रेस कल्याण रेल्वे स्थानकात आल्यावर प्रवाशांनी पकडलेल्या नराधम सोनुला पोलिसांच्या ( railway passengers beaten accused ) ताब्यात दिले पोलीस निरीक्षक कांदे, महिला पोलीस अधिकारी अर्चना दुसाने, सहायक पोलीस निरीक्षक मनोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक साळवे यांसह वसेकर, माळी, आखाडे, देशमुख, निवळे, शिखरे,पाटील, मुख्यदल, जाधव क्षीरसागर यांनी आरोपीला ताब्यात घेतले.

हेही वाचा-Narayan Rane Bungalow : नारायण राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तपासणीला पोहोचले पालिकेचे पथक, अन्..

नराधम इटारसी रेल्वे पोलीसांच्या ताब्यात..
नराधम सोनूवर कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली. मात्र सदरचा प्रकार मध्यप्रदेशातील इटारसी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. त्यामुळे हा गुन्हा वर्ग करून आरोपीला इटारसी रेल्वे पोलीसांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा-Narayan Rane : सुशांतसिंग आणि दिशा सालियन यांची हत्या, नारायण राणे यांचे खळबळजनक ट्विट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.