ठाणे - दोन व्यक्ती बेकायदेशीररित्या गावठी अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आल्याची माहिती मालमत्ता गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील सिडको बस स्टॉप येथे सापळा रचून तालीव सदाकत अली अन्सारी (वय २०) आणि इम्रान मो. इरफान अन्सारी (वय १९) यांना २ गावठी बंदुक आणि ६ जिवंत काडतुसांसह अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून अन्सार मो. अजीज सलमानी (वय १९) याला अटक करून त्याच्याकडून २ गावठी अग्निशस्त्र आणि २ जिवंत काडतुसे हस्तगत करण्याची कारवाई केली. तिन्ही आरोपींना ठाणे न्यायालयाने ६ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस पथक अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा - Diva Railway Station : दिव्यात लोकल ट्रेनने दिली तिघांना धडक; 2 ठार तर 1 गंभीर
खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर तालीव सदाकत अली अन्सारी (रा. जि. बदायू, रा. उत्तर प्रदेश) व इम्रान मो. इरफान अन्सारी (वय १९ रा. जि. बदायू, रा. उत्तर प्रदेश) यांना पोलिसांनी सापळा रचून ठाणे सिडको बसस्टोप येथून अटक केली. त्यांच्याकडे दोन गावठी अग्निशस्त्र आणि ६ जिवंत काडतुसे सापडली आहेत. त्यांच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात नेल्यानंतर ६ जून पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
आरोपी तालीव अन्सारी याच्या अधिक चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाच्या पथकाने अन्सार मो. अजीज सलमानी (वय १९ वर्षे रा. जि. बाराबंकी, रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली. त्याच्या अंगझडतीत २ देशी अग्निशस्त्र आणि २ जिवंत काडतुसे पोलीस पथकाने हस्तगत केली. त्यालाही न्यायालयाने ६ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. ठाणे गुन्हे शाखा मालमत्ता विभागाच्या पथकाने तीन आरोपींसह चार गावठी अग्निशस्त्र आणि ८ जिवंत काडतुसे हस्तगत करण्याची धडक कारवाई केली.
हेही वाचा - ठाण्यात ऑनलाईन गंडा, चोरट्यांनी लिंक पाठवून बँक खात्यातून 46 हजार लांबवले