ETV Bharat / city

ठाण्यात कोरोनाचा आकडा 671 वर, रविवारी सापडले 41 नवे रुग्ण - कोरोना व्हायरस

ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तर रविवारी मृतांच्या आकड्यात 2 ने भर पडून आतापर्यंत मृतांची संख्या 28 झाली आहे.

corona virus
corona virus
author img

By

Published : May 11, 2020, 12:19 PM IST

ठाणे - कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी जास्त प्रमाणात सुरूच आहे. रविवारी ठाण्यात कोरोनाचा आकडा 671 वर पोहचला आहे. तर रविवारी कोरोनाचे नवे 41 रुग्ण आढळले आहेत. माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीत शनिवारी रुग्णांचा आकडा 34 होता. रविवारी त्यात 4 ने वाढ झाली असून आकडा 38 वर पोहचला. तर, वर्तकनगर प्रभाग समितीत कोरोना रुग्णांचा आकडा 46 इतका होता. तर रविवारी 1 नवा रुग्ण सापडल्याने रविवारी रुग्णांचा आकडा 47 इतका झाला होता.

लोकमान्य-सावरकर प्रभाग समितीत शनिवारी कोरोनाबाधितांची आकडा 167 इतका होता. तर रविवारी 3 नव्या रुग्णांची भर पडल्याने एकदा 170 वर पोहचला. कोपरी-नौपाडा प्रबनहाग समितीत रुग्णांचा आकडा 64 वर होता तर रविवारी 1 नवा रुग्ण आढळला. रविवारी आकडा 65 वर पोहचला. उथळसर प्रभाग समितीत शनिवारी कोरोनाबाधितांनाचा आकडा 52 एवढा होता. तर रविवारी 4 नवे आढळल्याने आकडा 56 वर पोहचला आहे. रविवारी वागळे प्रभाग समितीत रुग्णांचा आकडा 122 वर असतानाच रविवारी पुन्हा 6 नवे रुग्ण आढळल्याने आकडा 128 वर पोहोचला. कळवा प्रभाग समितीत कोरोनाबाधितांचा आकडा 56 एवढा होता, तर रविवारी 8 नवे रुग्ण वाढल्याने रुग्णांची संख्या 64 झाली आहे. मुंब्रा प्रभाग समितीत शनिवारी रुग्णांचा आकडा 90 होता तर रविवारी 13 नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णांचा आकडा शंभरी पार 103 वर पोहचला. दिवा प्रभाग समितीत रुग्णांचा आकडा 40 एवढा होता. रविवारी 1 रुग्णांची भर पडल्याने आकडा 41 वर गेला.

ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू कोरोनामुले झाला. तर रविवारी मृतांच्या आकड्यात 2 ने भर पडून आतापर्यंत मृतांची संख्या 28 झाली आहे. शनिवारपर्यंत पालिकेने 6 हजार 812 सॅम्पल घेऊन तपासणीसाठी पाठवलेले आहेत. ठाणे पालिकेने रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयितांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. त्यांचा आकडा हा 1 हजार 733 एवढा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.