ठाणे - कोकणातील महाड चिपळूण या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच विविध ठिकाणाहून या पूरग्रस्त विभागाला मदत होत असताना ठाण्यातून देखील मोठी मदत शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने सर्व पूर परिस्थिती ठिकाणी पाठवण्यात येत आहे. प्रामुख्याने सर्वात पहिली मदतही कोकण पट्ट्यात पाठवली जात आहे. जवळपास 25 हजार कुटुंबियांना मदत ठाणे जिल्हा शिवसेनाच्या वतीने पाठवण्यात येत आहे. यात प्रामुख्याने तांदूळ, डाळ, साखर, तेल इत्यादी खाद्यपदार्थांचा समावेश असून 25 हजार ब्लॅंकेट साड्या टॉवेल इत्यादींसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
जिथे आपत्ती तिथे मदत -
कोकण प्रमाणेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणीदेखील म्हणजे सातारा कोल्हापूर सांगली रायगड या भागात शिवसेना ठाणे जिल्हाच्या वतीने मदत पुरवली जाणार आहे, असे यावेळी माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे बोलत होते.
केरळ मध्ये सुद्धा मदतीला धावले -
केरळमध्ये जेव्हा पावसाने थैमान घातले होते तेव्हा ठाण्यातून मदतीचा मोठा वाटा डॉक्टर मेडिकल साहित्य, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू ठाण्यातून रेल्वेच्या मदतीने पाठवण्यात आल्या होत्या त्यामुळे ठाण्याचा अडचणीच्या मदतीबाबाबत पुन्हा एकदा हा प्रत्यय पाहायला मिळणार आहे.