ETV Bharat / city

ठाण्यात कंटेनर-बस अपघातात १७ कामगार जखमी; ७ जण गंभीर - ठाणे अमेझॉन कंपनी बस अपघात १७ जखमी बातमी

भरधाव वेगाने बस मुंबई - नाशिक महामार्गावरील सरवली पाडा हद्दीत आली असता, कामगारांनी भरलेल्या या खासगी बसने रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातावेळी महामार्गावर एकच गोंधळ उडाला होता. अपघात घडताच जखमींना भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. १० जखमीवर उपचार करून घरी सोडण्यात आले. मात्र ७ कामगार गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले.

17 injured and 7 serious in container-bus accident at thane
ठाण्यात कंटेनर-बसच अपघातात १७ कामगार जखमी
author img

By

Published : Oct 5, 2020, 7:06 PM IST

ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावरील सरवली पाडा हद्दीत एका भरधाव वेगाने जाणाऱ्या खासगी बसने रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील १७ कामगार जखमी झाले असून जखमींपैकी ७ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

भिवंडी तालुक्यातील वडपे ग्रामपंचात हद्दीत अमेझॉन ऑनलाईन शॉपिंग कंपनी आहे. या कंपनीत शेकडो कामगार काम करत असून या कामगारांना ने - आण करण्यासाठी खासगी बसेस ठेवण्यात आल्या आहेत. काल (रविवार) रात्रीच्या सुमाराला रात्रपाळी करण्यासाठी काही कामगार याच बसमधून भिवंडीतील जुना जकात नाका येथून कंपनीत जाण्यासाठी निघाले होते. त्यादरम्यान भरधाव वेगाने बस मुंबई - नाशिक माहामार्गावरील सरवली पाडा हद्दीत आली असता, कामगारांनी भरलेल्या या खासगी बसने रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातावेळी महामार्गावर एकच गोंधळ उडाला होता. अपघात घडताच जखमींना भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. १० जखमीवर उपचार करून घरी सोडण्यात आले. मात्र ७ कामगार गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले.
भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्यात काम करणाऱ्या शेकडो कामगारांना ने - आण करण्यासाठी किमान ५० खासगी बसेस दिवसरात्र या मार्गावरून धावत असतात, या बसेस पैकी काही बस दुरस्तवर आल्या तर काही बसेसवर कामचलाऊ चालक असल्याने याबसेसचे लहान मोठे अपघात घडतच असतात. विशेष म्हणजे आरटीओच्या वाहन तपासणीत बाद ठरलेल्या बसेसही रस्त्यावर धावत असल्याने कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप काही प्रवासी कामगारांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.