ETV Bharat / city

Boy drowned in bucket : पाण्याने भरलेल्या बादलीत चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू - Bhiwandi crime news

घरातच खेळत असताना एक वर्षाचा चिमुकल्याचा पाण्याने भरलेल्या बादलीत पडून (Boy drowned in bucket) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील देऊनगर परिसरात घडली आहे.

Boy drowned in bucket
Boy drowned in bucket
author img

By

Published : Jan 3, 2022, 11:10 AM IST

ठाणे : घरातच खेळत असताना एक वर्षाचा चिमुकल्याचा पाण्याने भरलेल्या बादलीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील देऊनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दिलकैश अन्सारी असे चिमुरड्याचे नाव आहे.

चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

आई किचनमध्ये तर इतर भावंड टीव्ही बघण्यात होते मग्न

मृत चिमुरडा हा भिवंडीतील देऊनगर भागात कुटुंबासह राहत होता. घटनेच्या वेळी मृत चिमुकल्याची आई काल रात्रीच्या सुमारास किचनमध्ये जेवण तयार करीत होती. तर घरातील त्यांची इतर मुले टीव्ही बघत असताना चिमुकला त्यावेळीस खेळत होता. मात्र अचानक घरच्यांना तो पाण्याने भरललेल्या बादलीत पडलेला दिसला. त्यांनतर त्याला भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मृत मुलगा होता सर्वात लहान

मृत दिलकैश अन्सारी याचे ६ भावंड असून तो सर्वात लहान होता. या प्रकरणी मृतकची आई शबाना अन्सारी (वय २९ वर्ष ) यांच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. आता पोलीस नेमकी घटना कशी घडली याचा तपास करत आहे.

हेही वाचा - Woman Suicide With Childrens Jalna : जालन्यात स्वतःच्या चार चिमुरड्यांसह महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.