ETV Bharat / city

मीरा भाईंदरमध्ये १ लाख १० हजारांचे मॅफेड्रॉन अमली पदार्थ जप्त; एकाला अटक - etv bharat marathi

भाईंदर पश्चिमेच्या धावगी डोंगरी उत्तन परिसरात एक व्यक्ती मॅफेड्रॉन अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीवरून अमली पदार्थ विरोधी पथकाने शहानबाज आफिस खान उर्फ बबलू या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे २२ ग्रॅम मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ मिळून आला आहे.

अमली पदार्थ विरोधी पथक
अमली पदार्थ विरोधी पथक
author img

By

Published : Oct 30, 2021, 7:49 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) - अमली पदार्थ विरोधी पथकाने अमली पदार्थ विकणाऱ्या आरोपीला उत्तन धावगी डोंगरी परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे २२ ग्रॅम मॅफेड्रॉन अमली पदार्थ मिळून आले आहे. या प्रकरणी उत्तन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहानबाज आफिस खान उर्फ बबलू असे आरोपीचे नाव आहे.

भाईंदर पश्चिमेच्या धावगी डोंगरी उत्तन परिसरात एक व्यक्ती मॅफेड्रॉन अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीवरून अमली पदार्थ विरोधी पथकाने शहानबाज आफिस खान उर्फ बबलू या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे २२ ग्रॅम मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ मिळून आला आहे. बाजार भावाप्रमाणे 1 लाख 11 हजार इतकी अमली पदार्थांची किंमत आहे.

हेही वाचा-ड्रग विक्रेत्यांविरोधात एनसीबीची कारवाई; मुंबईसह पालघरमध्येही छापे

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुटे व भरोसा सेलचे प्रमुख तेजश्री शिंदे यांच्या टीमने केली आहे.

हेही वाचा-अमली पदार्थ विक्रेत्यांवर नागपूर गुन्हे शाखेची कारवाई; 66 आरोपी ताब्यात

अमली पदार्थांच्या गुन्ह्यात मुळापाशी जाणे गरजेचे

सध्या अमली पदार्थांवरून संपूर्ण देशात राजकारण तापले आहे. तर अमली पदार्थ व्यसन करणाऱ्या सोबतच विक्रीचे प्रमाण वाढले आहे. मागील अनेक दिवसात मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामध्ये अमली पदार्थ विरोधात मोठ्या कारवाया सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे. असे असले तरी हे अमली पदार्थ शहरात कसे व कुठून येतात यांच्या मुळापर्यंत जाणे काळाची गरज आहे.

हेही वाचा-दहिसर नाक्यातून 27 किलो चरस जप्त, मुंबई पोलिसांची कामगिरी

दहिसर नाक्यावरही सापडला होता अमली पदार्थांचा साठा

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ७ आणि ६ यांनी 26 ऑक्टोबरला मुंबई प्रवेशद्वार असलेल्या दहिसर चेकनाका येथे २७ किलो चरस जप्त केले आहे. या प्रकरणात चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या चरसची आंतरराष्ट्रीय किंमत १४ कोटी ४४ लाख रुपये आहे.

एनसीबीच्या कारवाईने अमली पदार्थांचा विळखा उजेडात

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डिया द क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने कारवाई केली होती. यात १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस, २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा या आठ जणांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे देशभरात अमली पदार्थांचा वापर आणि गुन्हे याविषयी चर्चा सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.