सोलापूर - भारतात नेहमी वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या विषयी चर्चा होत राहते. दरवर्षी 3 मे रोजी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिना निमित्त वृत्तपत्र स्वातंत्र्यवर चर्चा होते. आज जगातील बातम्या देण्यासाठी प्रेस हे सर्वोत्तम माध्यम आहे. जागतिक पातळीवर माध्यमांना स्वातंत्र्य मिळावे यासाठी संयुक्त राष्ट्रच्या महासभेत 3 मे हा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिवस म्हणून घोषित केले आहे. दरवर्षी 3 मे रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचे गिलेरमो कानो वल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार देखील दिला जातो. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताचा आजही घसरता क्रम आहे.188 देशांच्या यादीत भारत 142 व्या स्थानावर आहे, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार डॉ रवींद्र चिंचोळकर यांनी व्यक्त केली. भारत देशात सत्ताधारी पक्षाकडून नेहमी वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गधा आणली जाते किंवा त्यांची मुस्कटदाबी केली जाते.
World Press Freedom Day 2022 - जागतिक पातळीवर वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताचा घसरता क्रम - solapur city news
आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्व प्रेस स्वतंत्रता सूची किंवा यादीमध्ये भारताचा घसरता क्रमांक आहे. 188 देशांच्या यादीत भारताचा 142 वा क्रमांक लागतो. नॉर्वे,स्वीडन हे छोटे देश प्रेस स्वातंत्र्याच्या बाबतीत भारतापेक्षा पुढे आहेत. हा अहवाल दरवर्षी रिपोर्ट्स विदाऊट बोर्डर्स द्वारे प्रकाशीत केला जातो.