सोलापूर - रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विमानतळाजवळ असलेल्या टिळक नगर येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. रात्रभर कोसळत असलेल्या मुसळधार पाऊस आणि जमिनीखालुन येणारे पाणी यामुळे पाण्याचा निचरा होत न्हवता. पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे या घरांमध्ये पाणी पाणी झाले होते. स्वयंपाक घरातील भांडी पाण्यावर तरंगत होती. घरात पाणी शिरल्याने लोकांनी पूर्ण रात्र जागून काढली.
शहरातील होडगी रोडवरील विमानतळाच्या बाजूला असलेल्या टिळक नगरातील ६० ते ७० मध्ये अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. पावसाचा जोर जास्त असल्यामुळे अगदी कमी वेळात पाणी तुंबले. घरातील प्रत्येक खोलीत किमान अर्ध्या फुटांपेक्षा जास्त पाणी साचले होते. या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी आहे तसेच साचून राहते. या भागातील नगरसेवकांना याबाबत महिलांनी तक्रार केली. मात्र, नगरसेवक याबाबतीत लक्ष देत नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
सोलापुरात मुसळधार पाऊस; टिळक नगरात घरांमध्ये शिरले पाणी
शहरातील होडगी रोडवरील विमानतळाच्या बाजूला असलेल्या टिळक नगरातील ६० ते ७० मध्ये अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. घरातील प्रत्येक खोलीत किमान अर्ध्या फुटांपेक्षा जास्त पाणी साचले होते. या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था करून देण्यात आलेली नाही.