ETV Bharat / city

सोलापुरात लसींचा ठणठणाट; विडी कामगार महिलांचा लसीसाठी रास्ता रोको - Vaccines are not available at health centers

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लसींचा ठणठणाट निर्माण झाला आहे. शहर आणि जिल्ह्यातील नागरीक लसींसाठी मोठमोठ्या रांगा लावत आहेत. पण लस उपलब्ध नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

रास्ता रोको
रास्ता रोको
author img

By

Published : Jul 11, 2021, 5:29 PM IST

सोलापूर - सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लसींचा ठणठणाट निर्माण झाला आहे. शहर आणि जिल्ह्यातील नागरीक लसींसाठी मोठमोठ्या रांगा लावत आहेत. पण लस उपलब्ध नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 114 केंद्रावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या सर्व लसी पूर्ण संपल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत विषाणूची लागण होऊ नये यासाठी सोलापूरकर लसी घेण्यासाठी धावपळ करत आहेत, पंरतु ऐनवेळी लस नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. रविवारी अक्कलकोट रोडवरील मुद्रासन सिटी येथील नागरी आरोग्य केंद्रावर लस उपलब्ध नव्हती त्यामुळे लस घेण्यासाठी आलेल्या सर्व विडी कामगार महिलांनी अक्कलकोट सोलापूर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती.

सोलापुरात लसींचा ठणठणाट; विडी कामगार महिलांचा लसीसाठी रास्ता रोको

'दोन लस घेतलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण होत नाही'
दोन्ही डोस घेणाऱ्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्यास त्याला व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनची गरज भासत नाही. असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे देशातील नागरिक लस घेण्यासाठी रांगा लावत आहेत. त्यात विशेषतः 45 वर्षांपुढील रुग्णांसह 60 वर्षांवरील ज्येष्ठांचा समावेश आहे. आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचा देखील लसीच्या रांगेत समावेश आहे. पण लसींचा पुरवठा होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

रास्ता रोको
विडी कामगार महिलांचा लसीसाठी रास्ता रोको

शहरात 28 तर ग्रामीण भागात 86 केंद्रावर लस देण्याचे नियोजन -
सोलापूर जिल्हा आरोग्य प्रशासनाने आणि शहर आरोग्य प्रशासनाने लसींचे नियोजन केले आहे. शहरात 28 तर ग्रामीण भागात 86 आरोग्य केंद्रावर लसीचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र या आरोग्य केंद्रावर लसच शिल्लक राहत नाही. दर दोन दिवसांत लसींचा पुरवठा पुण्याहून केला जातो. पालकमंत्र्यांनी देखील शुक्रवारी झालेल्या बैठकीत लसीचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

लसीकरणासाठी जिल्ह्यात प्रतिसाद -
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत पहिला आणि दुसरा डोस मिळून सात लाख 34 हजार 148 जणांचे लसीकरण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी बार्शी तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 26.50 टक्के लसीकरण झाले आहे. तर मोहोळ व सांगोला तालुक्यात अन्य तालुक्यांच्या तुलनेत सर्वात कमी लसीकरण झाले आहे. मोहोळ तालुक्यातील 1 लाख 98 हजार 119 जणांचे, तर सांगोल्यात दोन लाख 30 हजार 977 जणांचे लसीकरण करण्याचे टार्गेट आहे. त्यापैकी मोहोळ तालुक्यातील 17.36 टक्के, तर सांगोल्यात 15.73 टक्केच लसीकरण झाले आहे.

मुद्रासन सिटी नागरी आरोग्य केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने विडी कामगार महिलांचा आक्रोश -
सोलापुरात 40 ते 50 कामगार हजार विडी उद्योगावर अवलंबून आहेत. यात महिला विडी कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. विडी कारखान्यात येण्यासाठी या महिलांना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी सकाळी दुसरा डोस घेण्यासाठी विडी कामगार महिलांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. सकाळी साडेदहा वाजता आरोग्य केंद्र उघडण्यात आले. मात्र आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी विडी कामगार महिलांना माहिती दिली की, लस उपलब्ध नाहीत. यावरून विडी कामगार महिलांचे आणि आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. या वादाचे रूपांतर रास्ता रोको आंदोलनात झाला. अचानक होत असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ताबडतोब वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. तब्बल तीन तास अक्कलकोट सोलापूर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू होते. यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.