सोलापूर - शहरातील नई जिंदगी परिसरात दीड महिन्यापूर्वी रूपा भास्कर शिंदे(वय 50 वर्ष, रा अंबिका नगर, नई जिंदगी सोलापूर) या महिलेचा खून झाला होता. संशयित आरोपींनी रूपा शिंदे यांचा गळा आवळून व तसेच दगडाने चेहरा ठेचून खून केला होता. ही घटना31 जानेवारी रोजी 2021 रोजी रात्री घडली होती.1 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून शोध सुरू केला होता. याबाबत अभिजित बाळकृष्ण शिंदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या खुनाचा उलगडला झाला असून पोलिसांनी तीन जणांना अटक केले असून यामधील दोन संशयित आरोपी हे मृत महिलेचे भाडेकरू असल्याची माहिती समोर आली आहे.
घर मालकिनीचा खून करून फरार झाले होते-
हेही वाचा - मंत्रालयातील वीज पुरवठा सुरळीत; ७ मिनिटात पुरवठा पूर्वपदावर आणल्याचा बेस्टचा दावा
या खुनात एमआयडीसी पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने अमीन अली रियाझ अहमद चौकी(वय 26 वर्ष रा ,अंबिका नगर, नई जिंदगी, सोलापूर),मुजमिल रियाझ अहमद चौकी(वय 22 वर्ष रा, अंबिका नगर, नई जिंदगी सोलापूर),संजय बसन्ना गुजले(वय 23 वर्ष,रा, मोदीखाना,सात रास्ता परिसर, सोलापूर) या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने हा खून केला असल्याची माहिती समोर आली आहे.मुजमिल व अमीनअली हे दोघे रूपा शिंदे यांच्या घरी भाड्याने राहत होते.पण हाताला काम नाही, करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला होता.भाड्याने जिच्या घरी राहत होते, ती मालकीन ही घरी एकटीच राहत होती.याकडे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असल्याची माहिती आरोपीना होती. त्यांनी सोबत संजय गुजले या मित्राला घेऊन चोरी करण्याचा डाव आखला होता.
चोरी करताना घर मालकीण रूपा शिंदे या जाग्या झाल्या होत्या-
अमीनअली चौकी, मुजमिल चौकी आणि संजय गुजले हे तिघे 31 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास रूपा शिंदे यांच्या घरात हळूच शिरले.आणि कपाट मधील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम घेत असताना रूपा शिंदे यांची झोपमोड झाली. घरात चोरटे शिरले आहे, याची जाणीव होताच त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. पण तिन्ही आरोपींनी रूपा शिंदे यांचा गळा आवळला. आणि त्या बेशुद्ध झाल्या. चोरी करून जाताना त्यांनी दगडाने रूपा शिंदे यांच्या चेहऱ्यावर घाव घातला. आणि निघून गेले. घर मालकीण रूपा या जाग्यावरच मृत झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी 1 फेब्रुवारी 2021 रोजी आजूबाजूच्या इतर भाडेकरूंना ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. आरोपी हे पळून न जाता घटनास्थळीच उभे होते. पोलिसांना देखील संशय आला नव्हता.
दीड महिन्यानंतर पोलिसांना सुगावा लागला -
एमआयडीसी पोलिसांचे डीबी पथक हे या खुना मागिल संशयित आरोपींचा शोध घेत होते. दीड महिना उलटला तरी आरोपी सापडत नव्हते. शेवटी आरोपींबाबत थोडीशी माहिती मिळाली. ताबडतोब संशयित आरोपींचे मोबाईल नंबर पोलिसांनी लोकेशन सरचिंगवर ठेवले. तिघे जण सात रस्ता परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. डीबी पथकाने ताबडतोब सात रस्ता परिसरात सापळा लावला आणि तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.आणि अंबिका नगर नई जिंदगी येथील खुनाचा छडा लावला. चोरी करण्याच्या उद्देशाने हा खून केला असल्याची माहिती पोलिसांनी यावेळीं बोलताना दिली.
हेही वाचा - या 5 कारमध्ये दडलीये अँटिलिया स्फोटके, मनसुख हिरेन मृत्यूची चावी