ETV Bharat / city

पूरबाधीतांचे पुनर्वसन करण्यास सरकार कटिबद्ध - सुभाष देशमुख - मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख news

दक्षिण सोलापूर मधील काही गावांमध्ये पूरस्थिती उद्भवल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून अनेकांना तात्काळ भरपाई मिळाली आहे. जे बाकी आहेत, त्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच मदत दिली जाईल, असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

पूरबाधीतांना लवकरच मदत - सुभाष देशमुख
author img

By

Published : Aug 23, 2019, 8:00 AM IST

सोलापूर - भीमा नदी पात्रात उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांना पुराचा वेढा पडला होता. यातील पूरबाधीत गावांची सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली.

पूरबाधीतांचे पुनर्वसन करण्यास सरकार कटिबद्ध - सुभाष देशमुख

दक्षिण सोलापूर येथील वडापूर, कुसूर, खानापूर, तेलगाव, भंडारकवठे, बाळगी, सादेपूर, लवंगी, कारकल, औज (मं), कुरघोट, टाकळी या गावांची सुभाष देशमुख यांनी पाहणी केली. गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. गावातील स्थलांतरित नागरीकांची विचारपूस केली. खानापूर येथील ३५ कुटुंबाचे तसेच तेलंगावसह अन्य काही गावातील कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी सहकार्य करू, असे सांगून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती मदत करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी प्रांत अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Intro:सोलापूर : दक्षिण सोलापूर मधील काही गावांमध्ये पूरस्थिती उद्भवल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असून पंचनामे चालू आहेत, पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून अनेकांना तात्काळ भरपाई मिळाली असून उर्वरित पंचनामे पूर्ण होताच मदत दिली जाईल असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.Body:भीमा नदी पात्रात उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांना पुराचा वेढा पडला होता. यात वडापूर, कुसूर, खानापूर, तेलगाव, भंडारकवठे, बाळगी, सादेपूर, लवंगी, कारकल, औज (मं), कुरघोट, टाकळी येथे सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती केली. स्थलांतरित नागरीकांची विचारपूस केली, खानापूर येथील ३५ कुटुंबाचे तसेच तेलंगावसह अन्य काही गावातील कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी सहकार्य करू असे सांगून प्रशासनाला देखील योग्य ती मदत देण्याच्या सूचना दिल्या.
वडापुर येथे अनेक शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमधून लाभ मिळाला असून काहींजण लाभाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले बँक खाते व्यवस्थित देण्याचे आवाहन यावेळी सुभाष देशमुख यांनी केले. प्रसंगी चर्चेत गावकऱ्यांनी कांदा अनुदान, बॅरेजेसचे त्रुटी पूर्ण करून कामाची गती वाढविणे, प्रलंबित कर्जमाफी असे काहीजणांचे उर्वरित विषय मांडले. Conclusion:भंडारकवठे गावातील पंचनामे झाले असून, पूरबाधित कुटुंबांना मदत मिळाली आहे, तेलगाव मधील २८ लोक बाधित आहेत, सर्वांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत, बाळगी, सादेपूर, कारकल ४ कुटुंबांना लाभ दिला आहे, औज (मं) १३ लोकांना मदत मिळाली आहे, कुरघोट ६ लोकांना मदत, टाकळी २० लोकांना मदत मिळाली आहे अशी माहिती यावेळी संबंधित विभागाने दिली. यावेळी प्रांत अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.