सोलापूर - गेल्या सहा महिन्यापासून सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती घसरली आहे. तसेच महानगरपालिकेच्या उत्पन्नात सुद्धा घट झालेली आहे. त्यामुळे महापालिकेच्या कर संकलन या विभागावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने टॅक्स(घरपट्टी) थकबाकीदार यांच्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे.
शास्ती करातून सूट-
या योजनेमध्ये शहरातील कर थकबाकीदार (घरपट्टी थकबाकीदार) यांसाठी अभय योजना सुरू केली आहे. ज्यांच्या टॅक्सवरती शास्ती लावण्यात आली आहे, त्यासाठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील नागरिकांनी नोव्हेंबर महिन्यात सर्व प्रॉपर्टी टॅक्स भरल्यास 80 टक्के शास्तीकरात सवलत देण्यात येणार आहे. तर डिसेंबर महिन्यात प्रॉपर्टी टॅक्स भरल्यास 70 टक्के व जानेवारी महिन्यात प्रॉपर्टी टॅक्स भरल्यास 60 टक्के आणि मार्च महिन्यात प्रॉपर्टी टॅक्स भरल्यास 50 टक्के करावरील शास्तीकरावर सवलत देण्यात येणार आहे.
सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना पालिका आयुक्तांनी आवाहन केले आहे, की ज्यांचे प्रॉपर्टी टॅक्स थकीत आहेत. त्यांनी नोव्हेंबर महिन्यात भरावे प्रॉपर्टी टॅक्स (घरपट्टी)भरून या योजनेचा लाभ घ्यावा. कोरोनाचा पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आर्थिक बळकटी करणासाठी मदत होईल, तसेच सोलापूर शहरातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी केले आहे.