पंढरपूर (सोलापूर) - येथे रामदास कदम व आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रतिमेस छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जोडेमारो आंदोलन करण्यात आले. एकनाथ शिंदे समर्थक माजी आमदार रामदास कदम आणि आमदार शहाजी पाटील हे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, युवा सेनेचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका करीत आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे व्यक्तव्य करीत आहेत. म्हणून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पंढरपूर येथे हे आंदोलन केले आहे.
वक्तव्याचा निषेध - नुकतेच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे जातील तिथे रश्मी ठाकरे असतात असे उद्गार काढत समस्त महिला वर्गाचा अपमान केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध म्हणून आज पंढपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना ठाकरे गटाकडून रामदास कदम आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
जशास तसे उत्तर देणार - शिवसेनेविषयी बेताल वक्तव्य केल्यास (will be given befitting reply) यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा (Solapur District Chief Sambhaji Shinde warns) जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, जिल्हा उपप्रमुख सुधीर अभंगराव, शहर प्रमुख रवी मुळे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख पूनम अभंगराव, शिवसेना उपशहर प्रमुख तानाजी मोरे, सचिन बनपट्टे, विनायक वनारे, अविनाश वाळके, बाबा आभंगराव, ईश्वर साळुंखे सुरज गायकवाड ,मारू धोत्रे,प्रदीप धोत्रे,मारू शिंगाडे, महिला आघाडीच्या सुनीता माने,मंजुळा दौंडमिशे, संगीता पवार, रवीना पठाण यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.