ETV Bharat / city

राज्यातील जिम चालकांना राज्य सरकारने मदत करावी- शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले

लाॅकडाऊनमुळे राज्यातील अनेक जिम चालक अडचणीत सापडले आहेत. शासनाने ज्या ठिकाणी जिम सेंटर चालते. त्या ठिकाणच्या जागेचे भाडे कपात करुन जिम चालकांना सरकारने मदत करावी, अशी मागणी प्रख्यात आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पटू संग्राम चौगुले यांनी केली आहे.

शरीरसौष्ठव संग्राम चौगुले
शरीरसौष्ठव संग्राम चौगुले
author img

By

Published : Jun 14, 2021, 9:38 AM IST

माढा (सोलापूर) - लाॅकडाऊनमुळे राज्यातील अनेक जिम चालक अडचणीत सापडले आहेत. शासनाने ज्या ठिकाणी जिम सेंटर चालते. त्या ठिकाणच्या जागेचे भाडे कपात करुन जिम चालकांना सरकारने मदत करावी, अशी मागणी प्रख्यात आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पटू संग्राम चौगुले यांनी केली आहे.

'राज्यातील जिम चालकांना राज्य सरकारने मदत करावी'

चौगुले यांनी जाणून घेतल्या जिम चालकांच्या समस्या

संग्राम चौगुले यांनी माढ्यातील सोलापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी अमीत सलगर यांच्या कुटुबियांना सदिच्छा भेट दिली. तसेच काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे यांची देखील मित्रप्रेम निवासस्थानी जाऊन चौगुले यांनी भेट घेत शहराची ऐतिहासिक माहिती जाणून घेतली. साठे व सलगर परिवाराच्या वतीने चौगुले यांचा सन्मान करण्यात आला. कुर्डूवाडीतील जिम सेंटरला देखील चौगुले यांनी भेटी देऊन जिम चालकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर चौगुले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

'प्रत्येक दिवसाकडे सकारात्मकतेने पहायला हवे'

कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे मला २० वर्षात प्रथमच माझ्या व्यवसायात तोटा झाला. बाहेर कुठे जाता आले नाही. असे जरी असले तरी मला कुटुबिंयासमवेत वेळ घालवण्याचा मनसोक्त आनंद मिळाला.
आयुष्यात नाते की पैश्यांना अधिक महत्व द्यायचे हे लोकांना या कालावधीत समजले. कोणत्याही संकटाकडे सकारात्मक नजरेने पाहणे गरजेचे आहे. माझे लसीकरण झाले आहे. प्रत्येकाने लसीकरणाबरोबरच मास्कचा वापर करुन काळजी घ्यायला हवी. भविष्यात काय होईल यापेक्षा प्रत्येक दिवसाकडे सकारात्मकतेने पहायला हवे. राज्यातील हजारो जिम चालकांच्या जागेचे भाडे कपात करुन राज्य सरकारने मदत करणे आवश्यक आहे, अशी मागणी यावेळी चौगुले यांनी केली.

'प्रत्येकाने आरोग्यासाठी व्यायाम, योगासने करणे गरजेचे'

प्रत्येकाने आरोग्यासाठी व्यायाम, योगासने करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढेल. कितीही पैसा असला तरी आजारी पडल्यावर शरीराने साथ द्यायला हवी. पैशापेक्षा शरीर संपदा महत्वाची असल्याचा सल्लाही चौगुले यांनी बोलताना दिला. यावेळी दादासाहेब साठे, अमीत सलगर, वेदांत साठे, सुमीत सलगर, सुजीत सलगर, विनायक सलगर, रोहित सोलनकर, सचिन सोलनकर, नितीन सोलनकर, संतोष शिंदे, राहुल शिंदे, मधुसूदन सोलनकर, प्रितम गवळी आदी उपस्थित होते.

हेही वाचा - एक वर्ष उलटले! अद्यापही सुशांत सिंहची हत्या की आत्महत्या हे गुढच...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.