पुणे - संपूर्ण कोरोना काळात बंद असलेली आणि नुकतीच सुरू झालेली पुणे- सोलापूर एक्सप्रेस इंद्रायणी एक्सप्रेस 25 दिवसांकरिता रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गाडी सुरू होऊन अवघे 5 ते 6 दिवस झाले होते. त्यातच पुन्हा एकदा ही गाडी बंद झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. रेल्वे प्रशासनाने भिगवन वाशिंबे दरम्यान रेल्वे मार्गाच्या दिवशी कामा हाती घेतलेले आहे. या कामामुळे पुणे- सोलापूर एक्सप्रेस इंद्रायणी एक्सप्रेस ( Pune Solapur Indrayani Express ) सह पुणे- सोलापूर डेमो गाडी देखील बंद करण्यात आली आहे.
24 जुलै ते 18 ऑगस्ट दरम्यान पुणे- सोलापूर डेमो गाडी बंद - पुणे- सोलापूर पुणे- इंद्रायणी एक्सप्रेस 25 जुलै ते 18 ऑगस्ट या कालावधीत रद्द राहणार आहे. तसेच भुवनेश्वर पुणे साप्ताहिक एक्सप्रेस 26 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत दर मंगळवारी भुवनेश्वरहून सुटणार आहे. पुणे- भुवनेश्वर साप्ताहिक एक्सप्रेस दर गुरुवारी पुण्याहून सुटणारी गाडी देखील रद्द राहणार आहे.
मिरज- कुर्डूवाडी मार्गे धावणार - तीहिरी साप्ताहिक गाडी दादर- पंढरपूर एक्सप्रेस 24 जुलै ते 31 आणि 25 जुलै ते 1 या कालावधीसाठी दादर होऊन सुटणारी पंढरपूर दादर एक्सप्रेस रद्द राहणार आहे. ते जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस सुटणारी विशाखापट्टणम एक्सप्रेस पुण्यातील रूपांतरित मार्गाने मिरज- कुर्डूवाडी मार्गे धावणार आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - Neeraj Chopra, World Athletics Championships : जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राला रौप्य पदक