ETV Bharat / city

Solapur : धक्कादायक, धावत्या एसटी बसमध्ये प्रवाशाने केलं विष प्राशन

author img

By

Published : Jun 9, 2022, 5:05 PM IST

सोलापूर बसस्थानकातून काही अंतरावर गेल्यावर तुळजापूरकडे जाणाऱ्या एका प्रवाशाने विष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रवाशाला सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं ( passenger poisoned in st bus at solapur ) आहे.

st bus
st bus

सोलापूर - कराड डेपोची बस गुरुवारी ( 9 मे ) दुपारी सोलापूर हुन उस्मानाबादला निघाली होती. सोलापूर बस स्थानकातून अनेक प्रवाशी उस्मानाबाद आणि तुळजापूरकडे निघाले होते. मात्र, सोलापूर बसस्थानकातून काही अंतरावर गेल्यावर तुळजापूरकडे जाणाऱ्या एका प्रवाशाने विष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली. ही बाब कंडक्टर व ड्रायव्हरच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत एसटी बस थेट सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलकडे वळवली. प्रवाशाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करुन त्याच्यावर उपचार सुरु केलं आहे. सिद्धेश्वर गुरुराज स्वामी (वय 53 वर्ष, द्वारका नगरी, विजापूर रोड, सोलापूर शहर), असे प्रवाशाचे नाव ( passenger poisoned in st bus at solapur ) आहे.

कंडक्टरच्या आले लक्षात - कराड डेपोची बस सोलापूर बस स्थानकात गुरुवारी 9 जून रोजी दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास दाखल झाली. 1.30 वाजण्याच्या सुमारास कराड ते उस्मानाबाद बस सोलापूर बस स्थानकातून उस्मानाबादकडे निघाली. 2 किमी अंतर गेल्यावर मागील सीटवर बसलेले सिद्धेश्वर स्वामी या प्रवाशास मोठा खोकला येत होता. तसेच, बसमध्ये विषारी औषधाचा उग्र वास पसरल्याने एक प्रवाशी उलट्या करत असल्याचे जी.एम.कांबळे यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने सोलापूर बस स्थानक प्रमुखाला ही माहिती देत रुग्णवाहिकेला बोलावून घेतलं.

प्रवाशाबद्दल माहिती एसटी कंडक्टर आणि प्रवाशी

बस थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वळवली - सिद्धश्वेर स्वामी यांची तब्येत जास्त असल्याने त्यांना एसटी बसमधून बाहेर काढता आले नाही. त्यामुळे कंडक्टर आणि चालकाने बस थेट सिव्हिल रुग्णालयात आणली. सिव्हिल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने सिद्धेश्वर स्वामीला बस मधून बाहेर काढत उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रवाशाची प्रकृती गंभीर असून, तो सध्या बेशुद्ध आहे. त्यावर उपचार सुरू आहे. एसटी महामंडळाचे अधिकारी सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले आहेत.

हेही वाचा - Beed Illigel Obortion Case : बीडच्या अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी नर्सची आत्महत्या केल्याचे उघड

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.