सोलापूर - शहरात सोमवारी 563 अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 475 निगेटिव्ह आले आहेत. तर 88 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहेत. सोमवारी तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर उपचार घेऊन बरे झाल्याने तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सोमवारी सोलापुरातील ग्रामीण भागामध्ये 211 अहवाल प्राप्त झाले असून, यामध्ये 162 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 49 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला असून, 28 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत व त्यांना डिस्चार्ज देत घरी सोडण्यात आले आहे.
पॉझिटिव्ह रुग्ण
शहर -3337+ग्रामीण - 899 एकूण - 4236
मृत
शहरी- 306+ ग्रामीण - 38 एकूण -344
उपचार सुरू
शहर -1258+ग्रामीण -493 एकूण - 1751
बरे झालेले रुग्ण
शहर- 1773+ग्रामीण-368 एकूण - 2141