सोलापूर - राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोलापुरात रविवारी (दि. 1 मे) महाराष्ट्र दिनी भोंग्यावर राष्ट्रगीत लावून भाजप नेते मोहित कंबोज यांचा निषेध करण्यात आला. हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोंग्यावरून महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मोहित कंबोज यांना भारतीय राज्यघटना भेट म्हणून देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे रोजगार विभागाध्यक्ष सागर शितोळे यांनी दिली.
धर्माच्या नावाखाली राजकारण - गुडी पाडव्याच्या संध्याकाळी मनसेचे राज ठाकरे यांनी हिंदुत्ववाच्या मुद्द्यावर बोलताना ,मशिदीवरील भोंग्याबाबत विधान केले. याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात झाले असून मशिदीवरील भोंगे न उतरविल्यास मशिदीसमोर हनुमान चालीस लावणार, असाही इशारा दिला. भाजपचे मोहित कंबोज यांनी महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी मोफत भोंगे वाटले आहे. सोलापुरातही मोहित कंबोज यांनी भोंगा पाठविला आहे.
राज्यघटना देणार भेट - यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरातील पार्क चौक येथे रविवारी 12 वाजण्याच्या सुमारास मोठ्या भोंग्यावरून राष्ट्रगीत लावून मोहित कंबोज यांचा निषेध केला. त्यांना भारतीय राज्यघटना भेट देणार असल्याची माहिती सागर शितोळे यांनी दिली.
पार्क चौकात झालेल्या निषेध आंदोलनात राष्ट्रवादी युवक रोजगार व स्वयंरोजगार विभाग शहराध्यक्ष सागर शितोळे, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष निशांत सावळे, रोजगार विभाग उत्तर विधानसभा अध्यक्ष श्रेयस माने, रोजगार विभाग उपाध्यक्ष ऋषी घोलप, विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष पद्मसिंह शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - Bhim Army Warn Raj Thackeray Aurangabad Sabha : औरंगाबादेतील राज ठाकरेंची सभा उधळून लावू; भीम आर्मीचा इशारा