सोलापूर - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज ( 27 एप्रिल ) रोजी सकाळी 11 ते 12 हा एक तास वाढत्या पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात शहरातील मुख्य पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. देशात वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या ( Gas Prices Increased ) विरोधात लोकांमध्ये आक्रोश आहे. याला परावृत्त करण्यासाठी हिजाब, हनुमान चालीसा, भोंगे जातीय दंगली घडवून देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोख्याला गालबोट लावला जात आहे, असा आरोप माजी आमदार आणि माकपचे नेते नरसय्या आडम यांनी केला ( Narsayya Adam Citicized Central Governement ) आहे.
पेट्रोल आणि डिझेलचा मूळ दरच चुकीचा - नरसय्या आडम म्हणाले की, अव्वाच्या सव्वा कर लावून केंद्र सरकार जनतेची लूट करत आहे. पण, पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे मुळातले दरच खोटे आहेत. सरकारी आणि खासगी कंपन्या शुद्ध पेट्रोल, डिझेल जनतेला विकतात. मात्र, ते शुद्ध तेल आयात करतच नाहीत. आयात करतात क्रूड तेल म्हणजेच कच्चे तेल. या कंपन्या फक्त ते कच्चे तेल शुद्ध करून विकतात.
भारत देशातही कच्चे तेल काढणाऱ्या विहिरी आहेत. असंख्य विहिरी केंद्र सरकारने अदानी, अंबानी आणि इतर बड्या भांडवलदारांना दिल्या आहेत. ते तेल काढण्यासाठी आयात कच्च्या तेला इतका खर्च येत नाही. ४५ टक्के स्वयंपाकाचा गॅस तर देशातच तयार होतो. देशातील क्रूड तेल, गॅस यांचा उत्पादन खर्च कमी आहे. परंतु, जनतेला विकताना शुद्ध आयात तेला इतका दर लावतात. ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे, अशी टीकाही नरसय्या आडम यांनी केंद्र सरकारवर केली आहे. या आंदोलनाला कार्यकर्ते व पदाधिकारी पेट्रोल पंपावर उपस्थित होते.
हेही वाचा - Sanjay Raut On Bhagatsingh Koshyari : राजभवन गुन्हेगारांना संरक्षण कसे देते?, संजय राऊतांचा सवाल