सोलापूर - स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळा पावसाच्या पाण्याने गळत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थीसह शिक्षकांना अस्मानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. सोलापूर शहर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. ही संततधार काही केल्या थांबण्याचे नाव घेते नाही. सोलापूरच्या इतिहासात प्रथमच अशा स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. एककिडे कधी नव्हे ते वरूनराजा दुष्काळी सोलापूर भागात कृपादृष्टी ठेवत आहे. तर, दुसरीकडे वेगळेच चित्र शहरात दिसत आहे.
शिक्षण विभागात देखील खळबळ - सध्या पुनःवसू नक्षत्राच्या पावसाने महापलिका प्रशासनाची झोप उडवली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे महापालिकेच्या विविध विभागाचे कामकाज वाढले आहे. अशातच शिक्षण विभागात देखील खळबळ माजली आहे. महापलिका प्रशासनाच्या शाळा क्रमांक नऊची अवस्था दयनीय बनली आहे.
![सोलापूर महानगरपालिकेच्या शाळेची अवस्था बिकट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sol-02-asmani-and-sultani-crisis-in-the-municipal-school-in-solapur-10032_13072022190542_1307f_1657719342_730.jpg)
विद्यार्थी आणि शिक्षकावर अस्मानी व सुलतानी संकट - स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळा पावसाच्या पाण्याने गळत आहेत. विद्यार्थीसह शिक्षक जिववावर उदार होऊन अध्ययन व अध्यापन करत असल्याचे विदारक चित्र सोलापुरात दिसत आहे. महापालिका प्रशासन याकडे सतत्याने दुर्लक्ष करीत असल्याने अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटात शाळा आणि विद्यार्थी शिक्षक अडकले आहेत. वरून पाऊस अन खालून प्रशासकीय मान्यतेच्या आडकाठ्या अशी दुहेरी कोंडी शिक्षकांसह विद्यार्थीसमोर उपस्थित झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शाळा दुरुस्ती करण्याचे पत्र मुख्यध्यापकांनी प्रशासनला वारंवार देऊनही यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.
![सोलापूर महानगरपालिकेच्या शाळेची अवस्था बिकट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sol-02-asmani-and-sultani-crisis-in-the-municipal-school-in-solapur-10032_13072022190542_1307f_1657719342_624.jpg)
जीव मुठीत धरून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत - ब्रिटिशकालीन ही इमारत कधी ढासळेल आणि अध्ययन व अध्यपान करणाऱ्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांना याची इजा सहन करावी लागेल याचा नेम नाही. महापालिकेच्या या शाळेतील सर्व वर्गखोल्याची हीच परिस्थिती असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचा परिणाम विद्यार्थी पटसंख्येवर झाला आहे.
![सोलापूर महानगरपालिकेच्या शाळेची अवस्था बिकट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sol-02-asmani-and-sultani-crisis-in-the-municipal-school-in-solapur-10032_13072022190542_1307f_1657719342_84.jpg)
सुलतानी संकटाचा सामना विद्यार्थी आणि शिक्षकांना करावा लागत आहे - विदयार्थी शाळेत बसण्यास घाबरत आहेत. काही वर्गात बेंच आहेत तर काही वर्गात मुलं खाली बसत आहेत. या चिमुकल्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून थंडी वाजून ताप येत आहे. शाळेत थंडी वाजते म्हणून मी शाळेत जाणार नाही अशा तक्रारी मुलं आपल्या पालकांना करीत आहेत. अशा अस्मानी अन सुलतानी संकटाचा सामना विद्यार्थी आणि शिक्षकांना करावा लागत आहे.
मोडकळीस आलेल्या शाळेत पाणी बाहेर फेकण्याचे काम- शाळेचे छत गळत असल्याने खाली भांडे ठेवून पाणी साठवून बाहेर टाकले जात आहे. यामुळे शिक्षकांना शिकवण्याचे काम कमी फरशी पुसण्याचे काम जास्त प्रमाणात लागत असल्याचे दृष्य आहे. सोलापूर शहरातील सिद्धेश्वर पंचकट्टा याठिकाणी असणाऱ्या या मनपा शाळेत गोरगरीब सामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहेत. अशा या मोडकळीस आलेल्या शाळेमध्ये वर्ग भरत असल्याने पालकांमध्ये देखीले भीतीचे वातावरण आहे.
मुख्यधपकांनी वेळोवेळी पत्र पाठवले - ब्रिटिशपूर्व 1945 सालातील हे शाळेचे बांधकाम असून आतापर्यंत देखील त्याची डागडुजी करण्यात आली नाही. शाळेच्या मुख्याध्यापकांनी वारंवार आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून आणि संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून देखील त्याला दाद दिली जात नाही अशी खंत तेथील शिक्षकांनी व्यक्त केली. महापालिकेच्या शाळेची अशी दयनीय अवस्था बनली असताना एखाद्या निष्पाप जीवाचा बळी गेल्यानंतर महापालिका प्रशासन आणि संबंधित विभाग याकडे लक्ष देणार का? सवाल आता पालकांमधून उपस्थित होत आहे.
हेही वाचा - Vishwanath Bhoir : 'शिवसेना शहर प्रमुख मीच, निर्णय उद्धवजींचा...'; बंडखोर आमदाराने स्पष्ट केली भूमिका