सोलापूर - महाविकास आघाडी सरकारमध्ये माझ्या मतदार संघाच्या विकासासाठी निधी खेचून आणले. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकच आहेत. आम्ही ही लढाई शंभर टक्के जिंकू, असा विश्वास आमदार प्रणिती शिंदे ( MLA Praniti Shinde Solapur ) यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीमध्ये तीन पक्षाचा सरकार सत्तेत आहे. पण शिवसेना पक्षातील एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारला आवाहन देत मोठा राजकीय भूकंप निर्माण केला आहे. यावर विरोधकांनी महाविकास आघाडीतील नेते शरद पवार यांवर गंभीर आरोप केले असून महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांचे खच्चीकरण केले आहे. एक प्रकारे काँग्रेस संपविण्याचा डाव आहे, असाही आरोप करण्यात आला. यावर प्रणिती शिंदे बोलताना काँग्रेस कधीही संपणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
'बहुमत सिद्ध करण्यात आम्ही शंभर टक्के यशस्वी होऊ' : महाविकास आघाडीमधील आमदार हे महाराष्ट्र राज्य सोडून सुरत आणि आसाम येथे गेले आहेत. महाविकास आघाडी सरकार धोक्यात आली आहे, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. पण बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना मुंबईत यावे लागेल. ज्यावेळी बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल त्यावेळी महाविकास आघाडी सरकारची सत्ता येईल, असा विश्वास काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - NCP Agitation Nagpur : नागपुरात राष्ट्रवादीचे नारायण राणेंविरोधात 'चप्पल मारो आंदोलन'