ETV Bharat / city

Supriya Sule On Solapur Rural Police : तांड्यावरील महिलांना सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून रोजगार उपलब्ध; सुप्रिया सुळे म्हणाल्या... - सोलापूर ग्रामीण पोलीस तेजस्वी सातपुते

अवैध हातभट्टी दारु तयार करणाऱ्या महिलांना गारमेंट कारखाने उभे करून त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम ग्रामीण पोलिसांनी केले ( Job Available Women From Solapur Rural Police ) आहे. त्याची दखल खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी घेतली असून, त्यांनी सोलापुरला भेट दिली आहे.

Supriya Sule
Supriya Sule
author img

By

Published : Apr 20, 2022, 7:33 PM IST

सोलापूर - सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या प्रयत्नामुळे सोलापुरातील तांड्यावरील महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अवैध हातभट्टी दारु तयार करणाऱ्या महिलांना गारमेंट कारखाने उभे करून त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम ग्रामीण पोलिसांनी केले ( Job Available Women From Solapur Rural Police ) आहे. त्याची दखल खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी घेतली असून, त्यांनी सोलापुरला भेट दिली आहे.

तांड्या वरील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला - तेजस्वी सातपुते ( Tejaswi Satpute ) यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध हातभट्टीवर काम करत असलेल्या महिलांवर कारवाई न करता त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.

supriya sule
सुप्रिया सुळे गारमेंटची पाहणी करताना

सोलापूर ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन परिवर्तन - पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तांड्यावर राहत असलेल्या किंवा अवैध दारूच्या व्यवसाय मध्ये काम करत असलेल्या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ऑपरेशन परिवर्तन सुरू केले. यामधून शेकडो महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आली. तसेच, तांड्यावरील गावात असलेल्या सामाजिक मंदिरात गारमेंट कारखाना सुरू केला. त्यांनी शिवलेल्या कपड्यांना आंतरजिल्हा बाजार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

सुप्रिया सुळेंनी घेतली दखल - अवैध व्यवसाय म्हणून ओळख असलेल्या मुळेगाव तांडा येथील महिलांना गुन्हेगारी प्रवृत्ती मधून बाहेर आणून स्वतः च्या पायावर उभे राहण्यास ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन परिवर्तन मधून प्रोत्साहीत केले. खासदार सुप्रिया सुळे यांनी याची दखल घेत लोकसभेत हा विषय मांडला. तसेच, सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे कौतुक केले. बुधवारी ( 20 एप्रिल ) सुप्रिया सुळे या सोलापुरात आल्या आणि थेट तांड्या वर जाऊन महिलांशी संवाद साधला. याबाबत केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय टेक्सटाईल मंत्रालयाकडे माहिती सादर करून मदत उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे सोलापूर ग्रामीण पोलिसांना पुरस्कार मिळवून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Satej Patil : सतेज पाटलांनी उडवली चंद्रकांत पाटलांची खिल्ली; म्हणाले, 'भाजपने इतिहासाची बदनामी...'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.