सोलापूर - तेलगू हास्य अभिनेते ब्रह्मानंद यांच्या सोलापुरातील रोड शोला अलोट गर्दी उसळली होती. सोलापूर शहरामध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारासाठी ब्रह्मानंद यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. ब्रह्मानंद यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
सोलापूर शहरांमध्ये पूर्व भागात तेलगू भाषिक लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तेलगू भाषेत मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोलापूर शहरमध्य मतदार संघामध्ये निवडणुकीला उभ्या असलेल्या महेश कोठे यांनी तेलगू तील प्रसिद्ध हास्य अभिनेते ब्रह्मानंद यांना प्रचारासाठी आणले होते. ब्रह्मानंद व तेलगू सिने अभिनेत्री यांचा रोड शो सोलापूर शहरातील शहर मध्य विधानसभा मतदारसंघात पार पडला.