सोलापूर - पतीचे निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्याने पत्नीने रेल्वेखाली स्वतःला झोपून देवून आत्महत्या केली. हा प्रकार 29 सप्टेंबर रोजी सोलापूर रेल्वेस्टेशन जवळ भैय्याचौक बोगद्याजवळ घडला आहे. अनुसया अप्पासाहेब कोरे (वय ३८, रा. मल्लेवाडी, ता. मंगळवेढा) असे या विवाहितेचे नाव आहे. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
हेही वाचा - महागाई विरोधात सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने
पतीला कोरोना सदृश्य आजार होते; पण उपचार सुरू असताना मृत्यू
अप्पासाहेब कोरे यांना निमोनियाचा त्रास होवू लागल्याने काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांचे 29 सप्टेंबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या आजारपणातील सेवेसाठी पत्नी अनुसया या सोलापुरात होत्या. उपचारासाठी झालेला भरमसाठ खर्च आणि त्यात पतीच्या निधनाचे वृत्त ऐकून त्यांना धक्का बसला. यातच त्यांनी सोलापूर रेल्वेस्टेशन नजिक रेल्वे रुळावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडीखाली स्वतःला झोपून देवून आत्महत्या केली.
सात वर्षाचा मुलगा पोरका झाला -
अनुसया यांचे सासू - सासरे, दिर आधीच मृत पावले आहेत. कोरे दांपत्याला सात वर्षांचा एक मुलगा आहे. मात्र तो आता पोरका झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली. याबाबत पोलीस अधिकारी प्रल्हाद चव्हाण अधिक तपास करीत आहे.
हेही वाचा - World Tourism Day 2021: चाळीस वर्षानंतरही उजनी पर्यटन विकास दुर्लक्षितच -अरविंद कुंभार