ETV Bharat / city

सोलापुरात 60 पॉजीटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू;1687 जणांना कोरोनाची लागण

author img

By

Published : May 11, 2021, 10:43 PM IST

सोलापूर जिल्ह्यात असे एकूण 2703 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.सोलापूर जिल्ह्यात आज मंगळवारी 1687 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 60 रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

Solapur Corona Patient Number
सोलापूर कोरोना रुग्ण संख्या

सोलापूर - सोलापूर ग्रामीणमध्ये आज मंगळवारी 2478 रुग्ण बरे झाले तर शहरात 225 रुग्ण बरे झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात असे एकूण 2703 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात आज मंगळवारी 1687 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 60 रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

सोलापूर ग्रामीण-
सोलापूरच्या ग्रामीण भागात मंगळवारी 7078 जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामधून 1547 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 2478 रुग्णांनी कोरोना महामारीवर मात केली आहे. उपचार घेत असलेल्या 49 रुग्णांनी उपचारा दरम्यान दम तोडला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही 15610 रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यांवर उपचार सुरू आहेत.सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोना महामारीने थैमान मांडले आहे. दररोज रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. जिल्हा आरोग्य प्रशासन हतबल होत आहे. कारण आज सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दगावले आहेत.
सोलापूर शहर-
सोलापूरच्या शहरी भागात कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे.आज मंगळवारी 1919 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामधून 140 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली.सोलापुरात आज कोरोना पॉजीटिव्ह रुग्णांपेक्षा अधिक म्हणजेच 225 जण कोरोना मुक्त झाले आहेत. सोलापूर शहरातील आरोग्य प्रशासनाने हळूहळू कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. आज मंगळवारी 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या देखील कमी होऊ लागली आहे. सोलापूर शहरात ऍक्टिव्ह रुग्ण संख्या देखील कमी होत आहे. शहरात विविध रुग्णालयात 1376 ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.