सोलापूर - महाराष्ट्रसह सोलापूरमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळे उद्याने पूर्णपणे बंद करण्यात आली होती. आठ महिने उद्याने बंद असल्याने बाळ गोपाळांची व मॉर्निंग वॉक, योगा करणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली होती. बुधवारी सायंकाळी मनपा आयुक्त पी शिवशंकर व उपायुक्त धनराज पांडे, यांनी दिलेल्या आदेशानुसार सोलापूर शहरातील बगीचे व उद्याने उघडण्याचा आदेश दिला.
शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव हळूहळू आटोक्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने सर्व व्यवसाय, उद्योग, सुपर बझार, वाहतूक व्यवस्था, जिम, चित्रपटगृहे व धार्मिक स्थळे नियम व अटींनुसार सुरू करण्यात आले आहेत. तर बाग बगीचे, उद्याने बंदच होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आयुक्तांनी आदेश काढला व उपायुक्त यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली.
बाळ गोपाळ, मॉर्निंग वॉक व योगासने करणाऱ्याची सोय-
बाळ गोपाळ, मॉर्निंग वॉक व योगासने करणाऱ्या नागरिकांची सोय झाली आहे. सकाळच्या स्वच्छ वातावरणात व्यायामसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी बुधवारी सायंकाळी मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी लेखी आदेश काढला व मनपा उपायुक्त धनराज पांडे यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली. या निर्णयाचा स्वागत करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी निवेदन दिले आणि श्रेय लाटण्याचा प्रयत्न-
मिशन बिगीन अंतर्गत सर्व जनजीवन पूर्वपदावर येत आहे. धार्मिक स्थळे उघडण्यात आल्यानंतर बाग बगीचे, उद्याने आजदेखील बंद आहेत. हे सुरू करावे, अशी मागणी करत निवेदन देण्यात आले होते. तसेच प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. मनपा आयुक्तांनी त्वरित याबाबत आदेश पारित केले. दरम्यान, वंचितने या निर्णयाचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा होत आहे.
हेही वाचा- सदाभाऊंनी काय साध्य केलं; पहा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट
हेही वाचा- 'गुपकर आघाडीत काँग्रेसचा सहभाग; जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम लागू होणार नाही'