ETV Bharat / city

एमआयएम, भाजप आणि मनसे जातीचे राजकारण करतात; आडम मास्तरांच्या वक्तव्याने सोलापूरचे राजकारण तापले - adam mastar on election

माजी आमदार नरसय्या आडम यांनी आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम, भाजपा आणि मनसे विरोधात सर्व पक्षांनी मतदारांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. हे तिन्ही पक्ष जातीय वादी असल्याचा आरोप आडम मास्तर यांनी केला आहे. या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून एमआयएमने देखील आडम यांच्यावर टीका केली आहे. आडम यांनी यापूर्वी अनेकवेळा व्यासपीठावरून नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. आणि आता ते जातीयवादी पक्ष म्हणून टीका करत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

नरसय्या आडम(वयस्कर)माकप नेतेमाजी आमदारसोलापूर

author img

By

Published : Sep 24, 2021, 7:19 AM IST

Updated : Sep 24, 2021, 10:16 AM IST

सोलापूर - महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई वगळता सर्व महापालिका निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकाही पार पडणार आहेत. या दृष्टीने सोलापुरातील राजकारण्यांनी आपल्या आपल्या मतदारसंघातील मतदारांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यानच माजी आमदार नरसय्या आडम यांनी भाजप एमआयएम आणि मनसे या तीन पक्षांच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. हे तिन्ही तिन्ही पक्ष जातीय समीकरणे खेळून सत्तेत येत असल्याचा गंभीर आरोप आडम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावर एमआयएमचे नेते फारुक शाब्दी यांनी देखील प्रत्युत्तरादाखल आडम यांच्यावर राजकीय टीकेचा पलटवार केला आहे.

आडम मास्तरांच्या वक्तव्याने सोलापूरचे राजकीय वातावरण तापले

भाजप, एमआयएम आणि मनसे जातीयवादी पक्ष आहेत- नरसय्या आडम-

गुरुवारी माकपच्या वतीने भारत बंदबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी माकप नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांनी भारतीय जनता पक्ष, एमआयएम आणि मनसे विरोधात एकत्र व्हा, भाजपला सत्तेतून बाहेर काढायचे असेल तर एकत्रित लढा द्यावा लागेल, असे आवाहन जनतेला आणि इतर पक्षांना केले. कारण हे तिन्ही पक्ष(मनसे, भाजपा, एमआयएम) जातीय राजकारण किंवा जातीय समीकरणे मांडून मते मागतात. भारतीय जनता पक्षाने अशीच जातीय समीकरणे मांडून सत्ता प्राप्त केली आहे आणि विकास मात्र काडीएव्हढा केला नाही, असेही ते यावेळी म्हणाले. सोलापुरातील महानगरपालिका क्षेत्रातील विकास भाजपमुळे खुंटला आहे, स्मार्ट सिटीच्या नावाखाली भोंगळ कारभार सुरू आहे, असे खोचक टोले मारत आडम मास्तर यांनी एमआयएम आणि भाजपवर निशाणा साधला.

फारुक शाब्दी- एमआयएम नेते
फारुक शाब्दी- एमआयएम नेते

एमआयएम शहर अध्यक्ष फारूक शाब्दींचा पलटवार-

माकपा नेते आडम यांच्या या आरोपानंतर सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर एमआयएम शहर अध्यक्ष फारूक शाब्दी यांनी आडम यांच्यावर पलटवार केला आहे. हेच आडम मास्तर अनेकवेळा व्यासपीठावर मोदींची स्तुती करताना दिसून येतात. तसेच हे आमच्यावर जातीय समीकरणांचा आरोप करत आहेत. मात्र सेक्युलर म्हणणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीने शेवटी शिवसेनेशी हात मिळवणी केलीच ना? त्यामुळे आडम यांनी जातीयवादाच्या मुद्द्यावर न बोलता विकासाच्या मुद्यांवर राजकीय टीका टिपन्नी करावी, असे आवाहन एमआयएम शहर अध्यक्ष फारुक शाब्दी यांनी आडम यांना केले आहे.

हेही वाचा - आगामी निवडणुकांसाठी वेळीच मिळणार जातवैधता प्रमाणपत्र : राज्य निवडणूक आयुक्त

हेही वाचा - डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण; कठोर कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना आदेश

Last Updated : Sep 24, 2021, 10:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.