सोलापूर - बॉबी समाजविकास संंस्थेचे संस्थापक व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते अजित भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्त बेघर निवारा केंद्र येथे सलग ६व्या वर्षी दिवंगत नेते एस आर. (दादा) गायकवाड सार्वजनिक वाचनालय व महात्मा फुले तरुण मंडळाच्यावतीने अन्नदान करण्यात आले. यावेळी येथील ज्येष्ठ नागरिकांना सुग्रास भोजनाची मेजवानी देण्यात आली.
या कार्यक्रमाला महापालिकेचे नगरसेवक संजय कोळी, राजुभाऊ काकडे, अजित भाऊ गायकवाड तसेच अमोल धेंडे, संयोजक अभिजीत कांबळे (फिनिक्स साऊंड)चे मालक उपस्थित होते.
एस. आर. (दादा) गायकवाड सार्वजनिक वाचनालय भागवते वाचकांची भूक
दिवंगत नेते एस आर. (दादा) गायकवाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने समाजातील गोर-गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप करण्यात येते. तसेच ज्येष्ठ व्यक्तींच्या वाचनासाठी दररोज सकाळी विविध वृत्तपत्रे उपलब्ध करुन देण्यात येतात.
कोरोना काळात मुक्या जनावरांसाठी चाऱ्याची सोय
वाचनालयाच्या सर्व सदस्यांकडून कोरोना काळात मुक्या जनावरांचे हाल पाहून त्यांच्यासाठी चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच रस्त्यावरील भटक्या जनावराच्या आरोग्याची काळजीही घेतली जाते.
कार्यक्रमासाठी यांनी दिले योगदान
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्यजित वडावराव, संघदिप आहेरकर , जितु गायकवाड, दिपक कदम, हिरा होटकर, संघपाल वाघमारे, लखन बेल भंडारे यांनी परिश्रम घेतले.