सोलापूर - वालचंद कॉलेज येथे असलेल्या क्वारंटाईन सेन्टरमध्ये बुधवारी सकाळी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. तीन दिवसांपासून त्या वृद्ध महिलेस दम लागत होता. त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार करून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असल्याची तक्रार करण्यात आली होती. मृत्यूनंतर सेन्टरवर मोठा गोंधळ झाला होता. त्यावर चौकशी आदेश देत करणे दाखवा नोटीस देण्यात आली असल्याची माहिती महापालिका उपायुक्त पंकज जावळे यांनी दिली.
कोंडा नगर येथील एका कुटुंबास क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने संपूर्ण कुटुंबाला वालचंद कॉलेजमधील मुलांच्या वसतिगृह येथे विलगीकरण करण्यात आले होते. दोन दिवसांपासून कोंडा नगरमधील वृद्ध महिलेस दम लागत असल्याची तक्रार करण्यात आली असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी तक्रार मृत महिलेच्या नातेवाईकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर केली होती. पण दुर्लक्षपणामुळे त्या वृद्ध महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला होता.
त्यावर उपायुक्त पंकज जावळे यांनी हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील त्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यामुळे त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना सदरच्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने या मध्ये जे कोणी दोषी असतील ज्यांनी कर्तव्य मध्ये कसूर केले असेल त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीसच्या खुलासाअंती आवश्यक ती प्रशासकीय कारवाई सोलापूर महानगरपालिकेचे मार्फत करण्यात येईल अशी माहिती उपायुक्त पंकज जावळे यांनी दिली.