सोलापूर - आंतरराष्ट्रीय ग्लोबल अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले ( Ranjitsingh Disale ) यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. जिल्हा परिषदेच्या परितेवाडी येथील शाळेत व डायटकडे सतत गैरहजर राहिल्याचा मुख्य कारण चौकशी अहवालात नोंद असल्याची माहिती जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार ( Education Officer Kiran Lohar ) यांनी दिली आहे. हा चौकशी अहवाल जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. जिल्हा परिषद सीईओ यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी अहवाल आणखीन वाचला नाही, अशी माहिती दिली आहे. पण चौकशी अहवालानुसार कारवाई झाली तर सेवासमाप्त किंवा बडतर्फी होऊ शकते. जवळपास 7 ते 8 पानांचा चौकशी अहवाल पाच सदस्यीय टिमने तयार केला आहे. तर रणजितसिंह डिसले यांनी या अगोदर जिल्हा परिषद शिक्षण विभागाला 200 पानांचा खुलासा सादर केला आहे. कारवाई होण्याअगोदर डिसले यांनी राजीनामा पूर्व अर्ज दिला आहे. राजीनामा मंजूर होण्याअगोदर सोलापूर जिल्हा परिषद प्रशासन त्यांच्यावर कारवाई जरूर करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी लोहार यांनी दिली आहे.
अगोदर जिल्हा प्रशासन 17 लाख वसूल करणार : सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) येथील शाळेत कार्यरत असणारे उपशिक्षक रणजितसिंह डिसले हे 2017 ते 2020 असे तीन वर्षे सतत गैरहजर असल्याचा चौकशी अहवालात नमूद करण्यात आला आहे. 34 महिने गैरहजर राहून देखील शासनाची फसवणूक करत वेतन घेतले आहे. त्याबद्दल सोलापूर जिल्हा प्रशासन गंभीर झाले असून सर्व रक्कम परत मागणार आहे.
'सुट्टीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे दिलीच नाही' : जानेवारी 2022 या महिन्यात रणजितसिंह डिसले सोलापूर जिल्हा परिषदेत येऊन पीएचडी करणार आहे आणि त्यासाठी 6 महिने सुट्टी मागितली होती. यावरून मोठे वादळ निर्माण होऊन तत्कालीन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दखल घेतली होती. सुट्टीचा अर्ज मंजूर केला होता. पण जिल्हा प्रशासनाने सुट्टीसाठी पीएचडीचे सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. ग्लोबल अवॉर्ड विजेते रणजितसिंह डीसले यांनी आजतागायत एकही पीएचडी प्रवेशाचा पुरावा सादर केला नसल्याची माहिती शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली. रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन फुलब्राईट शिष्यवृत्ती मिळाली होती. त्याबाबत सोलापूर जिल्हा प्रशासन येथे एकही सबळ पुरावा शिक्षण खात्यात दिला गेला नाही. ग्लोबल पुरस्कार मिळाल्याबाबत देखील सबळ माहिती डिसले यांनी शिक्षण विभागाला दिली नाही.
परितेवाडी येथे नागरिकांच्या तक्रारी : डिसले गुरुजी यांची नियुक्ती सोलापूर जिल्हा परिषदेत 2008 साली उपशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यांची पहिली पोस्टिंग परितेवाडी येथे झाली होती. 2017 साली त्यांची प्रतिनियुक्ती माळशिरस येथील वेळापूर येथील डायट येथे झाली होती. 2017 ते 2020 असे प्रतिनियुक्तीचा कालावधी होता. मात्र, त्याकाळात ते वेळापूर येथील डायटसंस्थेत हजर झाले नव्हते. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर पुन्हा परितेवाडी येथे नियुक्ती झाली. परितेवाडी येथील कदम वस्तीमधील विद्यार्थी येथे शाळेत येत होती. पण त्या शाळेत शिक्षकच येत नसल्याने अनेकदा कदम वस्ती येथील नागरिकांनी शाळेत शिक्षक नसल्याची तक्रार केली होती.
हेही वाचा - Ranjitsingh Disale Guruji Resign: ग्लोबल टिचर रणजितसिंह डीसले गुरुजींचा राजीनामा